राधिका आपटे आणि मनोज वाजपेयी यांचा थ्रिलर पाहिलात? शिरीष कुंदरने म्हणे कथा चोरलीय

Subscribe to Bobhata

शिरीष कुंदरने दिग्दर्शित केलेली व मनोज वाजपेयी, नेहा शर्मा आणि आपली मराठमोळी मुलगी राधिका आपटे यांच्या अभिनयाने नटलेली 'कृती' एक वेगळ्या प्रकारची शॉर्टफिल्म आहे. पूर्ण 20 मिनिटे तुम्हाला खिळवून ठेवण्याची ताकद यामध्ये आहे. ही शॉर्टफिल्म रिलीज झाल्यानंतर सेलिब्रेटी मंडळींनी या फिल्मचे कौतुक करण्यास सुरवात केली.  पण एका वेगळ्याच पोस्टने आता ही फिल्म अधिक चर्चेत आली. 

 

'अनिल नेउपाने' या नेपाळी फिल्ममेकरने ही 'कृती'  फिल्म पाहिली आणि त्याला फक्त स्टोरीच नाही तर या फिल्मची सिनेमॅटोग्राफी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कामावरून उचललेली वाटली. त्याने एका फेसबुक पोस्टद्वारे आपले म्हणणे मांडले. 

 

तुम्ही त्याची फिल्म बघून ठरवू शकता खरंखोटं काय ते. पण उचलेगिरी टाळली पाहिजे हे मात्र खरं.. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required