सुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ !!

काशिनाथ घाणेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका पार पाडल्या. त्यातलीच एक भूमिका होती संभाजी महाराजांची. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका अजरामर ठरली.

तुम्हाला सर्वांना माहित आहेच काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. आता काशिनाथ घाणेकर यांचा बयोपिक म्हटल्यावर ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकाची झलक असल्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही. 

‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमातही सुबोध भावे यांनी काशिनाथ घाणेकर यांची ती अजरामर भूमिका पुन्हा एकदा जिवंत केली आहे. या भूमिकेतला त्यांचा एक फोटो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सुबोध भावे साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपण असतं ते या फोटोतही आपण पाहू शकतो.

चला तर बघून घ्या सुबोध भावे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कसे दिसतायत ते !!