तरुणाईला वेड लावायला आलंय 'दणका' गाणं....झलक बघून घे ना भावड्या !!

Subscribe to Bobhata

यावर्षी गणपती बाप्पाचं स्वागत होणार दणक्यात, महाराष्ट्राची उभी तरुणाई थिरकनार दणक्यात, कारण येत आहे 'दणका' हो 'दणका'….श्री दुर्गा फिल्म्स निर्मित, आदर्श शिंदे यांनी गायलेलं, मोहन नामदेव राठोड/रईस फारुखी दिग्दर्शित दणका हे गाणं रसिकप्रेक्षकांसमोर येत आहे.

लेखक तात्या ननावरे यांची शब्दरचना लाभलेलं, अश्विन भंडारे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं या जोडीचा अस्सल मराठी भाषेला jazz या विदेशी संगीतप्रकाराचा तडका देऊन मराठी रसिकांना वेगळं व जोरदार काहीतरी देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.

हे धम्माल गाणं नाशिकमध्ये चित्रित झालं. निर्माते श्री. सुधीर बागुल यांनी श्रवणीय असणार हे गाणं पहायलादेखील तितकंच रमणीय वाटावं, व नाशिकमधल्या जास्तीत जास्त कलाकारांना यात कला सादर करण्याची संधी मिळावी, हा उद्देश्य समोर ठेवून कोणतीही तडजोड न करता उच्च निर्मितीमुल्य देऊन नामांकित तंत्रज्ञ जसेकी कला निर्देशक योगेश इंगळे व छायाचित्रकार योगेश कोळी, नृत्य निर्देशक आनंद कुमार याना सोबत घेऊन, नृत्यतारका सिया पाटील सह तब्बल दोनशे कलाकारांच्या संचासह सलग चार दिवस चित्रीकरण करून हे गाणं पूर्ण केलं.

दिग्दर्शक मोहन नामदेव राठोड, रईस फारुखी, व निर्मिती व्यवस्थापक गिरीश सांगळे टीमने घेतलेली मेहनत नक्कीच सफल होईल व ही 'दणका' नावाची संगीत मेजवानी महाराष्ट्राची जनता नक्कीच पसंद करेल.

या निर्मिती प्रक्रियेत नाशिकचे स्थानिक कलाकार, नाशिक पोलीस, आकाशजी, महेश गायकवाड, ऍड. गुलाबराव आहेर, ऍड. बळीराम नामदेव राठोड,उद्योगपती राजेश जाधव व सुबोध पाटील फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.

चला तर रसिकहो 'दणका'चा टीझर बघून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required