गरीबांचा ‘पायरेट्स ऑफ दि कॅरिबियन’ - 'ठग ऑफ हिंदोस्तान'....ट्रेलर बघून घ्या राव !!

Subscribe to Bobhata

मिडोज टेलरच्या ‘ठगाची जबानी’वर ठग ऑफ हिंदोस्तान आधारित आहे असं सांगण्यात आलं होतं. पण दगा झाला ना राव. हे तर ‘पायरेट्स ऑफ दि कॅरिबियन’ आणि मनोज कुमारच्या ‘क्रांती’चं एकत्रित मिश्रण निघालं. आजच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात झाला. आमीर खानने यावेळी निराशा केली आहे.

ब्रिटीश काळात भारतात ठगांचं मोठं जाळं पसरलेलं होतं. याविषयी सविस्तर माहिती ‘ठगाची जबानी’ पुस्तकात येते. चित्रपट मात्र पुस्तकातून काहीच घेत नाही असं दिसतंय. ठगांच्या कथेच्या अगदी विरुद्ध कथा सिनेमात आहे. दिग्दर्शकाने या ठिकाणी ठगांना देशभक्त म्हणून उभं केलंय. नुकतेच आलेले इंग्रज, त्यांच्याविरुद्ध लढणारा एक देशभक्त (अमिताभ बच्चन) आणि देशभक्ताच्या विरुद्ध इंग्रजांनी उभा केलेला हिरो (आमीर खान) असा जुनाच मसाला इथे दिसतो. सोबत जेवणात लोणचं असतं तसं कॅटरीना कैफ आणि नव्या ‘देवसेने’च्या रुपात फातिमा सना शेख आहेतच.

स्रोत

२ फिल्म्सना एकत्र करून नवीन बॉलीवूडपट तयार करण्यात विजय कृष्ण आचार्य यांचा हातखंडा दिसतोय. कारण याच टेक्निकच्या आधारे त्यांनी ‘धूम ३’ बनवला होता. ‘नाऊ यु सी मी’ (Now You See Me) आणि ख्रिस्तोफर नोलनच्या ‘दि प्रेस्टीज’ (The Prestige) सिनेमाची एकत्रित कॉपी म्हणजे “धूम ३”. दोन्ही सिनमे बघितल्यावर हे तुमच्या नक्की लक्षात येईल.

आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र काम करण्याचा योग तर जुळला पण अशा सुमार दर्जाच्या चित्रपटातून हे दुर्दैवच. आता तुम्हीच ट्रेलर बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा !!