ही २ नाटकं सांगतात लोक भोंदूबाबांना कसे फसतात ते !!

कालच आसाराम बापूला बलात्काराच्या गुन्ह्याखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरमीत राम रहीम सुद्धा आता जेल मध्ये बसलाय. ढोंगी बाबांच्या फसवणुकीला लोक कसे बळी पडतात हे या दोघांच्या भक्तांकडे बघून समजतं. आसाराम बापूला जन्मठेप झाली हे ऐकून त्याच्या भक्तांना अश्रू अनावर झाले हे याचं मोठं उदाहरण.

मंडळी, या आसाराम प्रकरणाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी २ नाटके घेऊन आलो आहोत. सामाजिक मानसिक दुर्बलतेचा फायदा भोंदू लोक कसा घेतात याचा नमुना म्हणजेच ही २ नाटके. या दोन्ही नाटकांचे लेखक आहेत आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांच्या सारख्या समर्थ लेखकाने या ढोंगीपणावर आपल्या लेखणीतून आसूड ओढले आहेत. पण आज आसरामच्या निमित्ताने हे पुन्हा पुन्हा उघडकीस आले आहे की समाज मनाने किती दुबळा झालेला आहे.

आचार्य अत्रेंनी लिहिलेली दोन नाटके आपल्याला दाखवतात की लोक कशाप्रकारे या बाबा बुवांच्या बोलण्याला बळी पडतात. त्यापैकी पाहिलं नाटक आहे ‘तो मी नव्हेच’. या नाटकातला हा प्रसंग पहा. बाबा बुवा आपल्या बोलण्यातून कशा प्रकारे लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना फसवतात हे तुम्हाला या प्रसंगातून दिसेल.

दुसरं नाटक आहे ‘बुवा तेथे बाया’. या नाटकाबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण हे संपूर्ण नाटक भोंदू बाबाच्या भोंदूपणावर ताशेरे ओढण्यासाठी लिहिलं आहे. यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काही तरी संदेश देऊन जातो. हे नाटक तुम्ही खाली बघू शकता.

मंडळी, आजच्या विज्ञान युगात अशा बाबा बुवांवर विश्वास ठेऊ नका, नाही तर आणखी आसाराम तयार होतील यात काही शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required