या फोटो मध्ये दिसणारी व्यक्ती 'अमिताभ तात्या' आहे की आणखी कोणी ?...पाहा बरं !!

काही दिवसापूर्वी आपले अमिताभ बच्चन ऊर्फ बिग बी तात्या ऐन शुटींगच्या वेळी आजारी पडले. तात्यांचे फॅॅन घाबरले ना भाऊ. पण सुदैवाने त्यांना काही झालं नाही. त्याच दरम्यान एक फोटो लिक झाला आणि नवी चर्चा सुरु झाली. हा फोटो होता ‘थग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातला अमिताभ तात्यांचा लुक. हा लुक रातोरात सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि काही नामांकित वेबसाईट्सने त्याला उचलून धरलं. हा फोटो तुम्ही खाली बघू शकता.

आहे ना भारी ? मंडळी हा लुक बघून सगळे अवाक झाले. काय फाडू लुक होता हा. एकदम युनिक. पण कसं हाय ना. हल्ली नेट वर येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते भाऊ हे परत एकदा सिद्ध झालं.

चला हा फोटो तर तुम्ही बघितला, पण आता त्यामागील सत्य बघा...

‘थग ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमा ठगांच्या आयुष्यावर आधारित आहे. १८०० च्या काळातील ठगाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसतील. असाच काहीसा लुक या फोटो मध्ये आहे. मळकी जुनी पगडी आणि चश्मा. या फोटो मध्ये दिसणारा माणूस हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्या सारखा दिसतोय. पण खरं तर हा फोटो अमिताभ बच्चन यांचा नाही. हा फोटो क्लिक केलाय ‘Steve McCurry’ या फोटोग्राफरने.

स्टीव्हने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट करताना याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती अशी की हा फोटो ‘शाबुज’ या (६८ वर्षीय) अफगाण माणसाचा असून तो निर्वासित आहे व सध्या पाकिस्तानात राहतो. इतर अनेक अफगाण लोकांप्रमाणे त्याला आडनाव नाही. तो फक्त शाबुज हे एकच नाव लावतो. योगायोग म्हणजे तो हुबेहूब अमिताभ यांची झेरॉक्स कॉपी दिसतो. म्हणून अनेकांना गोंधळात पाडलं.

मंडळी अमिताभ बच्चन यांचा ‘थग्स ऑफ हिंदोस्तान’ मधला खरा लुक बघण्यासाठी थोडे दिवस थांबावं लागेल. पण तूर्तास असल्या व्हायरल गोष्टींवर विश्वास ठेऊ नका....काय बरोबर ना ?