computer

'बुच' कळ्यात पडणे, ओलीस धरणे, जेरीस आणणे आणि अशाच काही मराठी वाक्यप्रचारांचा हा अर्थ कधी लावला होतात का?

मराठी भाषा जशी वळवाल तशी वळते. म्हणजे एक अक्षर जरी इकडे तिकडे झाले की अर्थ बदलतो. कधी कधी त्यातून इतके गंमतीदार अर्थ निघतात की हसून हसून पुरेवाट होते. सध्या सर्वच जण सोशल मीडियावर ॲक्टिव असतात. तिथेही बरेच ट्रेंड्स येत असतात. कधी मीम्स तर कधी काय!! सध्या एक ट्रेंड आलाय, मराठी वाक्यप्रचाराचा शब्दश: अर्थ घेत आगळेवेगळे आणि तितकेच धम्माल अर्थाचे मीम्स शेअर करण्याचा! शाळेत शिकलेल्या या वाक्यप्रचारांचा अश्या पद्धतीने अर्थ काढणारा कोण असेल बरं? त्याला कोपऱ्यापासून दंडवतच.. पण काहीही म्हणा या कल्पनाशक्तीला तोड नाही. एक गंमत म्हणून नक्की एकदा बघून घ्या, तुम्हीं कुठलही टेन्शन एका मिनिटात विसरून जाल.

 

बुचकळ्यात पडणे याचा अर्थ गोंधळणे, पेचात पडणे,काय करावे ते न कळणे असा होतो हे आपल्याला माहित्येय. पण या फोटोत काय अर्थ होतो ते पाहा.

एखाद्याला जेरीस आणणं म्हणजे काय असतं हे तुम्ही अनुभवलं असेलच. पण टॉम अँड जेरीमधल्या 'जेरी'स आणणे असं हे भन्नाट मीम पाहून तुम्हीही जेरीस आला नाहीत ना?

''आज रपट जायें तो' या गाण्यातील अमिताभ आणि स्मिता पाटील यांच्या रोमँटिक सीनवरुन 'ओलीस धरणे' असा वाक्यप्रचार करणे कोणाच्या आयडियाची कल्पना असेल?

भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी..या म्हणी चा अर्थ काय आणि फोटो काय? महेश भट पाय पसरून बसलाय. कमाल आहे बाबा!

प्राण कंठाशी येणे म्हणजे अभिनेता प्राण मिठी मारतोय ? हा असा वाक्प्रचार अर्थ पाहून कोणाला हसू येणार नाही.

कानाखाली वाजवणे म्हणजे भांडणाचे टोकाचे रूप. या गंभीर विषयाचा हा हलकाफुलका अर्थ काढून फोटो बनवलाय. कोणीही भांडण विसरून खो खो हसू लागेल नाही का?

ताकास तुर न लागू देणे म्हणजे कोणाला काही कळू न देणे! पण याचा सरळसरळ अर्थ काढणारा कोण अवली असेल बरं ?

उचलबांगडी करणे म्हणजे एखाद्याची रवानगी करणे, एखाद्याला कामावरून काढून टाकणं..पण हा फोटो किती सहज अर्थ काढतोय पाहा.


 

नाकापेक्षा मोती जड! याला अजून कॅप्शन द्यायची गरज आहे का?

खरंच या मिम्सने सोशल मीडियावर खूप धमाल आणली आहे. हे पाहून अनेकांची सुपीक डोकी चालतील हे नक्की. कदाचित तुम्हालाही एखादे हलकेफुलके, खुसखुशीत मिम् सुचले असेल.. शेयर करण्यास विसरू नका..

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required