अमेरिकेतल्या झिंगाट डान्सचा हा व्हिडिओ पाह्यला का? जाळ आणि धूर संगटच!!

Subscribe to Bobhata

आपल्या भारतीयांची एक खास सवय म्हणजे जिथे जायचे तिथे आपल्या आवडीच्या गोष्टींचा ठसा सोडून यायचा. म्हणजे बघा ना, अनेकवेळा परदेशी स्टेडियम्सवर आपले फॅन लोक मैदानावर भारतीय गाणी म्हणताना दिसतात. मध्यंतरी सलमान भाईच्या फॅन्सनी थेटरमध्ये फटाके उडवले तो ही याचाच एक भाग.

आता असाच एक व्हिडिओ वायरल होत आहे. हा व्हिडिओ २०१६ सालचा आहे. २०१६ साल म्हणजे सैराट महाराष्ट्र गाजवत होता तेव्हाची गोष्ट. सैराटमधले झिंगाट गाणे महाराष्ट्राला थिरकायला लावत होते. हे फक्त महाराष्ट्रात होत होते अशातला भाग नाही, जगभर सैराट आणि झिंगाटचे फॅन दिसतील.

२०१६ सालचा हा वायरल होणारा व्हिडिओ थेट अमेरिकेतला आहे. कोलोरॅडोमधल्या एका थेटरमध्ये झिंगाट लागल्यावर पब्लिक तुफान डान्स करायला सुरुवात करते. डिट्टो झिंगाटसारख्या स्टेप्स करून लोक थेटरमध्ये डान्स करताना या व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ आता वायरल झाल्यावर लोकांनी यावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

व्हिडिओत ४२ व्या सेकंदाला एक अमेरिकन बाई हा प्रकार बघत असताना दिसते. यावर पण बिचारीला या गाण्यामागील गमक समजले नसेल अशा प्रतिक्रिया येत आहेत. एकाने झिंगाट लागले आणि पाय थिरकले नाहीत असे होणे अशक्य असल्याचे म्हटले तर एकाने चांगल्या गाण्यांचा असाही प्रभाव असतो असे म्हटले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required