computer

कोरोना व्हायरसच्या कॉलर ट्यून मागचा आवाज या बाईंचा आहे!! आणखी कुठे त्यांचा आवाज ऐकलाय आठवतंय का?

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कॉलर ट्यून म्हणून आधी खोकल्याचा आवाज यायचा मग एक बाई येऊन सूचना द्यायच्या. कोरोनापेक्षा त्या सूचनेची आणि भयंकर खोकल्याची भीती वाटू लागली होती. सध्या तो खोकल्याचा आवाज निघून गेला आहे, पण त्या बाई नियमीतपणे सूचना देऊन जातात.

कोण आहेत या बाई? सुचना देणारा तो आवाज आहे तरी कोणाचा? याचा शोध घेतल्यावर काय हाती लागलं पाहा.

हा आवाज जसलीन भल्ला या वॉईस ओव्हर आर्टिस्टचा आहे. ती पूर्वी स्पोर्ट्स चॅनेल्ससाठी पत्रकार आणि निर्माता म्हणून काम करायची. मागील १० वर्षांपासून ती  वॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. 

पुढे वाचण्यापूर्वी वॉईस ओव्हर म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया.

वॉईस ओव्हर म्हणजे सिनेमा, नाटक किंवा रेडीओवर आपला आवाज देणे. हा आवाज देणारी व्यक्ती समोर दिसत नसते म्हणूनच वॉईस ओव्हरला 'ऑफ कॅमेरा कॉमेंट्री' देखील म्हटलं जातं. जाहिरातींमध्ये किंवा टीव्हीवर कार्यक्रमांच्या सुरुवातीला मागून जो आवाज दिलेला असतो तो वॉईस ओव्हर आर्टिस्टचा असतो. लगान सिनेमात मागे अमिताभ बच्चन यांचा आवाज पण वॉईस ओव्हरचं उदाहरण म्हणता येईल.

तर, जसलीन गेल्या १० वर्षापासून हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि इतर भाषांमधून आपला आवाज देत आहे. तिचा आवाज तुम्ही पहिल्यांदा नक्कीच ऐकत नसणार, हे आम्ही पैजेवर सांगू शकतो. पूर्वी डोकोमोची जी जाहिरात यायची, तिच्या मागचा आवाज जसलीनचा होता. Interactive voice response म्हणजे IVR साठी जसलीनने आवाज दिला आहे. उदाहरणच द्यायचं तर हेल्पलाईनवर कॉल केल्यावर अमुक पर्याय निवडण्यासाठी तमुक क्रमांक दाबा सांगणारा यांत्रिकी आवाज देखील जसलीनचा असतो. टेलिकॉम, हॉस्पिटल, एअरलाईन्ससाठी लागणारे असे अनेक IVR तिने केले आहेत.  एवढंच नाही तर पुस्तकं ऑडीओ रुपात सादर करणाऱ्या अमेझॉनच्या ऑडीबलसाठी जसलीनने काम केलंय. तिच्या आवाजातील ३ पुस्तकं ऑडीबलवर ऐकायला मिळतात.

सध्याच्या कोरोनाच्या सूचनेमुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. आता या पुढे जेव्हा केव्हा तो यांत्रिकी आवाज ऐकाल तेव्हा जसलीनची आठवण नक्कीच येईल. 

जाता जाता आपल्या मराठमोळ्या वॉईस ओव्हर आर्टिस्ट 'मेघना एरंडे'च्या आवाजाची जादू पाहूया. 

सबस्क्राईब करा

* indicates required