लाच घेणं म्हणजे काय ?

निजामाचा फिरबीखान नावाचा दिवाण होता.तो इनाम,वतने,जहागिरी इत्यादी प्रकरणात सारख्या शिफारशी करायचा.त्यामुळे त्याला चांगली प्राप्ती पण होत असे.
एकदा निजामाला संशय आला की आपला दिवाणी लाच खातो म्हणून त्याने फिरबीखानाला बोलावून म्हटले की

' अशा अतिशयोक्तीने भरलेल्या शिफारसी करणे बरे नाही'
यावर फिरबीखान म्हणाला 'आपले काम काढून घेण्याचे अनेक मार्ग लोक अवलंबत असतात. 
बादशहाने पैसे घेतले तर त्याला 'पेशकश'(खंडणी) म्हणतात.
वजिरानेपैसे घेतले तर त्याला नजर ( देणगी) म्हणतात.
खानसाम्याने पैसे घेतले तर त्याला दस्तुर (वहीवाट) म्हणतात.
खात्याच्या सचिवाने पैसे घेतले तर त्याला शुकराना(आभार प्रदर्शन) म्हणतात.
कारकूनाने पैसे घेतले तर त्याला तहरीर (मजकूर) म्हणतात.
धर्मखात्याच्या मुख्याने काही पैसे घेतले तर त्याला मेहेराना (कृपा) म्हणतात.
सरकारी अधिकार्‍याने पैसे घेतले तर त्याला जरीन (कांचन) म्हणतात.
शिपायांनी पैसे घेतले तर त्याला सजावलाना (दंडेली) म्हणतात.
आणि माझ्यासारख्या माणसाने म्हणजे दिवाण फिदबीखानाने घेतले तर तुम्ही त्याला रिश्वत (लाच) म्हणता !!
असं खणखणीत उत्तर देऊन फिदबीखान राजीनामा देऊन निघून गेला. 
(संदर्भ- सेतू माधवराव पगडी लिखित 'विडारंगतो असा' या पुस्तकातून)

सबस्क्राईब करा

* indicates required