कॉर्नड्रील-काय आहे हे नवे इंटरनेट खूळ, पाहा या चायनीज मुलीला ते कसे महागात पडले..

Subscribe to Bobhata

आईसबकेट नंतर इंटरनेटवर आजकाल एक नवीन फॅड आलं आहे- ’कॉर्नड्रील’. म्हणजे ड्रील मशीनच्या बीट किंवा पात्यावर मक्याचं कणीस लावायचं अन मशीन सुरू करायची. वेगातल्या कणीसावर दात लागले की मक्याचे दाणे सुटे होतात. ज्या वेगाने ते सुटे होतात, त्याच वेगाने ते खाऊन टाकायचे. आता ड्रील मशीनचा वेग पाहता हे प्रकरण चार-पाच सेकंदात आटपतं. पण इतक्या वेगाने तोबरा भरला गेल्यानंतर काही खाता तर येतच नाही, उलट सगळं बाहेर सांडतं.

आता जे कुणी हे ’कॉर्नड्रील’ धाडस करत आहेत, ते त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही असं करण्यासाठी आव्हान देत आहेत. मौजमजेत मित्रही यात सामिल झाल्याने सगळे धमाल करत आहेत. परंतु हा सगळा प्रकार  या चित्रफितीतल्या चीनी मुलगीला भलताच महागात पडलाय. लांब केस मोकळे सोडून ती कणीस खायला गेली आणि ड्रीलमध्ये केस अडकून तिच्या केसांचा पुंजकाच मुळापासून उखडला गेला. तिला त्या भागात टक्कल तर पडलंच पण वेदना झाल्या त्या वेगळ्याच. या ’कॉर्नड्रील’मध्ये केस गमावणारी किंवा एकंदरीतच अपघातात सापडणारी हे पहिलीच मुलगी आहे.

सुदैवाने सोशल मिडियावर लोक या ’कॉर्नड्रील’ला नावे ठेवत आहेत आणि हे लोण तितकंसं जास्त पसरत नाहीय हे नशीब. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required