मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न महाग का असतात?

सिनेमा बघायला जायचा म्हटले म्हणजे सिनेमाच्या तिकीटापेक्षा पॉपकॉर्नच्या खर्चाचे टेन्शन येते. बाहेर अतिशय स्वस्त असलेले पॉपकॉर्न नेमके थेटरात इतके महाग का असते हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तिथली पॉपकॉर्नची महागाई ही इतर महागाईपासून नेहमीच एक पाऊल पुढे असते. म्हणून पॉपकॉर्नची किंमत हा बऱ्याचवेळेस मिम्स आणि ट्रोलिंगचा विषय होत असतो.

सिनेमाचे तिकीट सिनेमानुसार कमी जास्त होते. मात्र तुम्ही कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये गेले तरी पॉपकॉर्न मात्र महागच असते. आणि फक्त पॉपकॉर्नच नाहीत, तर तिथे मिळणारे सर्वच खाद्यपदार्थ हे प्रचंड किंमतीला विकले जातात

सिनेमाघरातले पॉपकॉर्न इतके महाग का असतात याचे उत्तर आता मिळाले आहे आणि ते इतर कोणी नाही, तर बलाढ्य अशा पीव्हीआर सिनेमागृहांचे मालक अजय बिजली यांनी दिले आहे. अजय बिजली यांनी इकॉनॉमिक टाइम्स सोबत झालेल्या चर्चेत याविषयी सविस्तर उत्तर दिले आहे. 

 

मल्टिप्लेक्समध्ये जा प्रशस्त सोयीसुविधा दिल्या जातात, त्याची भरपाई म्हणून खाद्यपदार्थ हे महाग विकले जातात हे त्यांचे सरळसोपे उत्तर आहे. मॉलमधल्या जागेचे भाडे, मल्टिप्लेक्समधील महाग सामान या गोष्टींचा खर्च काढून प्रॉफिट काढायचे म्हटल्यावर खाद्यपदार्थ महाग विकणे गरजेचे असते हेच ते स्पष्ट करताना दिसतात. खाद्यपदार्थांच्या किंमतीविरुद्ध जेव्हा ग्राहक आवाज उठवतात त्याचा दोष आपण ग्राहकांना देऊन चालणार नाही हे देखील ते मान्य करतात. 

पण या किंमती कुठल्याही प्रकारे कमी होणार नाहीत हे ही त्यांनी सांगितले. ते म्हणतात, 'भारत अजूनही सिंगल स्क्रीन ते मल्टिप्लेक्स या बदलाच्या काळात आहे. आधी एकच स्क्रीन असल्याने एकच प्रोजेक्शन रूम आणि साऊंड सिस्टीम लागत असे. पण आता यात ४-६ पट अधिक वाढ झाली आहे. तसेच आता एसी मुळेही खर्च वाढतो' असं त्यांचं म्हणणं आहे.

अशा पद्धतीचे म्हणणे हे अजय बिजली यांचे आहे आणि म्हणूनच आम्हाला सिनेमागृहातील सिनेमाच्या तिकिटाव्यतिरिक्त खाद्यपदार्थ महाग विकून बिजनेस करायचा असतो असे ते सांगत आहेत. खाद्यपदार्थ मधून होणारी कमाई ही तब्बल १५०० कोटी वार्षिक इतकी आहे हे देखील विशेष.  आयनॉक्स आणि पीव्हीआर यांनी एकमेकांत विलीन होण्याची प्रक्रिया देखील पुढील काही महिन्यात पूर्ण होणार आहे. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required