बॉक्स नाही, ऑफिस नाही, मग ही बॉक्सऑफिस काय भानगड आहे भाऊ ?

मंडळी,  शुक्रवार  म्हणजे  फिल्म रिलीज होणारा दिवस. आजकाल एकाच शुक्रवारी बरेच सिनेमे रिलीज होतात. आणि मग संध्याकाळपर्यंत न्यूज चॅनेल्सवर, सोशल मिडीयावर एकच बातमी असते.. ती म्हणजे, ‘अमक्या फिल्मने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केली’, ‘तमक्या फिल्मने बॉक्सऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले’ किंवा ‘ढमका सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला’... इत्यादी इत्यादी. 

मंडळी, कित्येकदा आपण हे बॉक्सऑफिस-बॉक्सऑफिस ऐकत असतो. पण कधी प्रश्न पडला आहे का, हे बॉक्सऑफिस प्रकरण आहे तरी काय ?

तिकीट बारीला हे लोक बॉक्सऑफिस काऊन बोलतात राव? तिकडं तर बॉक्स पण नसतो, मग बॉक्सऑफिस नाव ठेवण्यामागचं कारण काय? मंडळी उत्तर माहित नसेल तर आम्ही सांगतो...

बॉक्सऑफिस म्हणण्यामागचं पहिलं कारण... राणी एलिझाबेथच्या काळात सर्वच स्तरातल्या लोकांना चित्रपट बघण्यास मिळत असे. सामान्य लोकांना जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती आणि जे लोक श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी बॉक्सच्या आकारातील स्पेशल सीट असायची.  या थिटर मध्ये सर्वांच्या समोरून एक बॉक्स फिरवला जायचा, आणि त्यात जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे टाकायचा. या बॉक्समध्य साठलेल्या पैशांतून चित्रपटाने केलेली कमाई ठरवली जायची. सामान्य माणसाने दिलेल्या पैशांपेक्षा बॉक्स सीटवाल्या लोकांकडूनच खरी कमाई व्हायची. यातूनच पुढे ‘बॉक्स ऑफिस’ हे नाव रुजलं.

स्रोत

बॉक्सऑफिसबद्दल दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते की, पूर्वी थिएटरच्या बाहेर आजच्यासारखं तिकीट काउंटर नसे. त्याजागी बॉक्सच्या आकारातली एक लहान रूम असायची. याच लहानशा जागेतून तिकीट विक्री होत असे. या बॉक्ससारख्या जागेलाच लोक बॉक्सऑफिस म्हणू लागले. पुढे जमाना बदलला, तसा या बॉक्सऑफिसला थिएटरमध्ये एक स्पेशल जागा मिळाली.  पण लोकांना पूर्वीचं बॉक्सऑफिस हेच नाव लक्षात राहिलं.

काळाच्या ओघात आपण काही गोष्टी कायमच्या स्वीकारतो तसाच हा प्रकार आहे. आजच्या काळात बॉक्स नाही, बॉक्सच्या आकारातले तिकीट काउंटर नाही, पण बॉक्सऑफिस आजही कायम आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required