computer

या मालिकेचा शेवट पण अप्पूच्या मृत्यूने होणार का ?

ज्यांना फॅमीली ड्रामा आवडतो त्यांची आवडती मालिका म्हणजे  'ठिपक्यांची रांगोळी' ! आता काहीजण फॅमीली ड्रामा म्हटल्यावर नाकं मुरडतात पण त्या मालिकेचे शिर्षक गीत -टायटल साँग- ऐकण्यासाठीसुध्दा काहीजण आतुरलेले असतात. रोहिणी निनावे यांनी लिहिलेले हे गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबधद केले आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊ या तो असा की : ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा अंत अप्पूच्या मृत्यूने होणार का ? 

असा विचार डोक्यात येण्याचे कारण असे की ही मालिका ज्या मूळ बंगाली मालिकेवर आधारीत आहे त्या मालिकेचा शेवट 'गुनगुन'च्या म्हणजे नायिकेच्या मृत्यूने करण्यात आला होता. त्या बंगाली मालिकेचे नाव आहे  'खोरकुतो '. ठिपक्यांची रांगोळी म्हणजे  'खोरकुतोची मराठी आवृत्ती आहे.तुम्ही त्या मालिकेतील गुनगुन बघा आणि या मालिकेतील 'अप्पू' बघा - एकदम कॉपी टू कॉपी .

खोरकुतोचा शेवट गुनगुनच्या मृत्यूने दाखवला होता आणि नंतर २५ वर्षांचा जंपकट मारून नंतरच्या पिढीत कहाणी पुढे जाताना दाखवली होती. आता मराठी मालिकेत पण असेच होणार असेल तर निर्मात्यांवर लोकं तुटून पडतील यात काही शंका नाही. 

आता एक महत्वाचा मुद्दा : आई कुठे काय करते - सातव्या मुलीची सातवी मुलगी - ठिपक्यांची रांगोळी या सर्व मालिका म्हणजे गाजलेल्या बंगाली मालिकांच्या आवृत्त्या आहेत . म्हणजे मराठीत कथानकांचा दुष्काळ पडलाय की मराठी लेखक मालिका लिहू शकत नाहीत ? 
फारशी मेहेनत न घेता 'कॉपी' मारून परीक्षा पास करण्याचा हा उद्योग तर नाही ना ? 

सबस्क्राईब करा

* indicates required