computer

दुसर्‍या महायुध्दात पोलिश सैन्याच्या जवानांसोबत लढत होते हे अस्वल !

आजवर तुम्ही प्राण्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से ऐकले असतील. यातले अधिकांश किस्से कुत्रे किंवा मांजरांशी संबंधित असतात. पण वोजतेक नावाच्या एका अस्वलाच्या दिलदारपणाची गोष्ट मात्र अधिक रंजक आहे. त्याने केलेले कामही काही साधेसुधे नव्हते. दुसऱ्या महायुद्धात हे अस्वल पोलंड देशाच्या सैनिकांबरोबर खांद्याला खांदा लावून लढले होता.

इतर देशांसाठी ते फक्त एक अस्वल असेल, मात्र पोलिश सैनिकांसाठी ते आपला एक आर्मी सहकारी होते. एका सैनिकाप्रमाणे या वोजतेकला सर्व गोष्टी देण्यात आल्या होत्या. पगाराऐवजी त्याला खाणे पिणे पुरवले जात असे. एवढेच नव्हे, तर त्याला लष्करात एक रँकही देण्यात आली होती.

वोजतेकची गोष्ट सुरू होते १९१४ साली. पोलिश आर्मीतील काही सैनिकांना एका रस्त्यावर एका अस्वलाचे पिल्लू दिसले. आजूबाजूला त्याच्याबद्दल चौकशी केल्यावर त्यांना समजले की दोन दिवस आधीच या अस्वलाच्या आईची शिकार करण्यात आली असून ते आता अनाथ झाले आहे. त्या सैनिकांना या अस्वलाला असे रस्त्यावर सोडणे काही पटले नाही.

आता अस्वल या सैनिकांबरोबर आर्मी कॅम्पमध्ये आले होते. आर्मी कॅम्पमध्ये तर ते आले, पण सैनिकांबरोबर राहून त्याचेही प्रशिक्षण होत गेले. पूर्ण तयारी झाल्यावर त्याला अधिकृतपणे आर्मीत भरती करून घेण्यात आले आणि त्याचे वोजतेक असे नामकरणही करण्यात आले.

हा वोजतेक मात्र चांगलाच आगाऊ होता. सैनिकांबरोबर राहून सिगारेट-बीअर पिणे, कुस्त्या खेळणे अशा गोष्टी तो करत असे. १९४२ साली पोलिश आर्मी आणि ब्रिटिश आर्मीचे एकत्रीकरण करण्यात येत होते. मात्र एक अडचण उभी राहिली. ब्रिटिश आर्मीत कुठलाही प्राणी घेतला जात नसे. पण पोलिश आर्मीने एकजूट दाखवत वोजतेक नाही, तर आम्हीही नाही अशी भूमिका घेतली.

ब्रिटिश आर्मीला वोजतेकला सैन्यात घ्यावे लागले. मॉँट कसिनोच्या युध्दात वोजतेकने चांगलेच कर्तृत्व गाजवले. समोरासमोरच्या युद्धात तर त्याच्या समोर टिकणे कुणालाही शक्यच नव्हते. तसेच तो इतरही हल्ले जबरा करत असे. शत्रू सैन्याचे ६०-७० किलोचे गोळ्यांचे बॉक्स तो गायब करत असे. याचबरोबर अनेक बाजूने तो पोलिश आर्मीला मदत करत असे.

वोजतेकने या युद्धात जे योगदान दिले, त्याचा सन्मान म्हणून पोलिश आर्मीने आपला लोगो बदलून त्यात अस्वल समाविष्ट केले होते. इतर सैनिकांप्रमाणे त्याची रँक प्रोमोट करण्यात आली. तसेच ते रीतसर निवृत्तही झाले होते. निवृत्तीनंतर तो स्कॉटलँडच्या एडिनबरा प्राणिसंग्रहालयात राहत असे. निवृत्त झाल्यावर देखील त्याला सैन्यातील त्याचे मित्र त्याला भेटायला येत असत.

या कर्तृत्ववान अस्वलाचा १९६३ साली नैसर्गिक मृत्यू झाला. पण त्याआधी तो पोलंडच्या इतिहासात एक राष्ट्रीय हिरो म्हणून अमर झाला होता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required