मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चक्क ५० तासांच्या चुंबनानंतर तिला बक्षिस म्हणून मिळाली झगमगीत कार!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
चक्क ५० तासांच्या चुंबनानंतर तिला बक्षिस म्हणून मिळाली झगमगीत कार!!

जगाच्या पाठीवर बर्‍याच विचित्र स्पर्धा भरतात. आणि बक्षिसं दांडगी असली की लोकांनाही भारी हौस येते असल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. अशीच एक स्पर्धा अॉस्टीन या शहरात भरली होती. इथं ५० तासांच चुंबन घेऊन एका महिलेने नवी कोरी चारचाकी जिंकली राव!! 

गैरसमज करून घेऊ नका हो.. हे चुंबन त्या कारचंच घ्यायचं होतं, कोणा व्यक्तीचं नाही. अॉस्टीनच्या 96.7 कीस एफएम ने या 'किस ए किया' नावाच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. किया हे कारचं नाव आहे बरं का. इथे अट फक्त एकच होती, जी व्यक्ती सर्वाधिक वेळ या कारला ओठ चिकटवून ठेवेल तिला ही ब्रँड न्यु किया अॉप्टीमा एलएक्स मिळणार. 

आता लोकांचं काय?  "फुकटचं घावलं आणि बापलेक धावलं", या म्हणीप्रमाणं वीस एक लोकांनी चुंबन स्पर्धेत सहभाग नोंदवला. पण दिर्घचुंबनाने कोणाच्या ओठांना फोड उठले तर कोणाची उभं राहून कंबर दुखायला लागली. शेवटी जिंकल्या त्या या जिद्दी दिलीनी जयसुरीया बाई. अभिनंदन... अभिनंदन... व्हिडीओ तर बघा... 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!
मनोरंजन

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!

भारत-चीन युद्धानंतर देशवासीयांचे मनोधैर्य उंचावणारा 'छोटा जवान' चित्रपट आणि बालकलाकार सचिन-महेश कोठारे.

१५ ऑगस्ट, २०२६

आचार्य अत्रे: ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र घडवला
मनोरंजन

आचार्य अत्रे: ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र घडवला

पत्रकार, नाटककार, वक्ता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खंदे नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कार्याचा आढावा.

१३ ऑगस्ट, २०२६

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने
मनोरंजन

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

दिग्दर्शक संतोष डावखर यांचा 'गोंधळ' चित्रपट २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला आहे.

१८ सप्टेंबर, २०२६