मस्त खाना मस्तानम्मा आज्जीकडे...सर्वात वयोवृद्ध युट्यूब निवासी!!!

Subscribe to Bobhata

युट्यूबवर आपली कला बिनधास्त मांडता येते म्हणून अनेकजण युट्यूब विडीओच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. हल्ली तर वेब सिरीजचा ट्रेंडच आलाय. तरुणांचा युट्यूब नामक ग्रहाकडे लोंढा वाढतोय.

तर असं आहे मंडळी की, युट्युबवर वाढलेल्या तरुणांच्या संख्येत एक १०६ वर्षांची आजी मोठीच बाजी मारून जात आहे. तुम्ही ऐकलं आहे का या आजींबद्दल? नाही? काय राव तुम्ही पण....थांबा सांगतो !!!

Image result for mastanammaस्रोत

या आहेत आंध्रप्रदेश मध्ये राहणाऱ्या मस्तानम्मा. जगातील सर्वात जुन्या ‘युट्यूब निवासी’! या एवढ्या वृद्ध आहेत कि यांना  युट्युबनं खरंतर पेन्शन द्यायला हवी! असो....

मस्तानम्मा पारंपारिक पद्धतीचा स्वयंपाक करतात. आणि या रेसेपी प्रचंड हिट झाल्या आहेत.  या मस्तानम्मा आजींच्या चॅनेलचं नांव आहे ‘country food’. आजच्या घडीला  या युट्यूब  चॅनेलवर  त्यांच्या कुकिंगचे  तब्बल ११७ विडीओ अपलोड झाले आहेत. एवढंच काय त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या तब्बल 2 लाख ६२ हजार एवढी आहे.

फिश करी, अंडा डोसा, बांबू चिकन बिर्यानी, चिकन कबाब, वांगी मसाला डिश, भेजा फ्राय, वगैरे वगैरे... असा सगळा पारंपारिक पद्धतीचा घाट  या आजी बाई घालतात. त्यांच्याकडे असणाऱ्या डिशेस बघून कोणत्याही शेफला घाम फुटेल !

Related imageस्रोत

एक मात्र खरं की मस्तानम्मा युट्यूबवर हिट झाल्या त्या त्यांचा पणतू लक्ष्मणमुळे!!  मस्तानम्मा स्वयंपाक करत असताना लक्ष्मण विडीओ तयार करतो आणि ते युट्यूबवर अपलोड करतो.

मस्तानम्मा यांच्या कुकिंग चॅनेलची एक खास बात म्हणजे त्या कोणत्याही किचन वा घरात स्वयंपाक करत नाहीत. तो करत्यात त्या अगदी  खुल्या जागेत.. या वयातही मस्तानम्मा यांना स्वतः स्वयंपाक करताना बघणं म्हणजे नक्कीच प्रेरणादायी आहे मंडळी...

अश्या या युट्यूबच्या आजींना बोभाटाचा कडक सलाम !!!

सबस्क्राईब करा

* indicates required