यश चोप्रांचा पुतळा स्विसमध्ये? स्वित्झर्लंडने केली एक ट्रेन आणि एक हॉटेल स्यूटही यश चोप्रांच्या नावावर..

भारतीयांच स्विस प्रेम जगजाहीर आहे. प्रत्येक भारतीयाला  आपला स्विस अकाउंट नाही तर गेला बाजार हनीमून तरी स्विसमध्ये  साजरा व्हावासा वाटतो.  त्यात DDLJ नंतर तर भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हॉट डेस्टिनेशन झालं आहे. अर्थात भारतीयांना स्विस आवडतं आणि भारतातून खूप पर्यटक स्वित्झर्लंडला जातात याची दखल स्विस सरकारलाही घ्यावी लागत आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आपण त्यांना देतोय.

अर्थात तिथे माउंट तितलीस सारख्या उंच पर्वत शिखराशी मिळणारा गरम वडापाव, भुट्टा त्या ठिकाणच्या भारतीय प्रेमाची साक्ष देतोच. इतक्या हजारो फूट उंचीवर असणारं DDLJ चं कटआउटसुद्धा त्यांच्या भारतधार्जिण्या धोरणाला अधोरेखित करतं.  आता यश चोप्रांचा पुतळाच बसवून स्विस लोकांनी या चित्रपटाचं आणि भारतीयांचं त्यांच्या लेखी असलेलं महत्व दाखवून दिल आहे. इतकंच नाही तर त्यांचं नाव एका तलावाला आणि एका ट्रेनलाही दिले गेले होते.

अडीचशे किलोंचा हा ब्रॉंझचा पुतळा पर्यटकांच्या आवडत्या इंटरलाकेन इथं उभारण्यात आलाय. नुकतंच त्याचं राणी मुखर्जी आणि पामेला चोप्रा यांच्या हस्ते अनावरण झालं.

सबस्क्राईब करा

* indicates required