computer

उठा उठा बातमी आली, फेसबुकवर फार्मविले ३ खेळायची वेळ आली!!

फेसबुकच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना एक ऑनलाइन गेम खेळलेला आठवत असेल. काहींनी तर खास हा गेम खेळण्यासाठीच फेसबुकवर खाते उघडले होते. तर, फार्मविले असे या गेमचे नाव आहे. हा गेम अनेकांचा आवडीचा होता. फार्मविले असेल किंवा पेटविले असेल, हे गेम आपल्याला फेसबुकवर जास्तीतजास्त वेळ थांबण्यास प्रवृत्त करत असत.

मागच्या वर्षी गेम डेव्हलपर झिंगा यांनी हा गेम बंद करत असल्याचे घोषित केले होते. यामुळे अनेक फार्मविलेप्रेमींची मोठी निराशा झाली होती. पण सर्व फार्मविले चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. झिंगा फार्मविले ३ वर काम करत असल्याचे समोर आले आहे.

शेतीविषयक स्ट्रॅटेजीवर आधारीत असलेला हा गेम येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे. प्ले स्टोरवर लवकरच यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. या नव्या गेममध्ये पण आधीप्रमाणेच वेगळ्या शेती विषयक गोष्टींचा भरणा असेल. यावेळी तब्बल १५० जातींच्या प्राण्यांचा समावेश या गेममध्ये असेल.

 

यात कोंबडी, गाय यांच्याबरोबरच फ्रेंडली वाघ, फ्लफी अल्पाकस अशा प्राण्यांचा समावेश असेल. या गेमच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांच्या पालन पोषणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. बदल्यात भन्नाट शेतीविषयक गोष्टीचा रीवार्ड गेम खेळणाऱ्यांना मिळणार आहे.

 

आधीच्या गेममधील लोकांना भावणारी मारी परत येणार आहे. गेमर्सना पूर्ण गेममध्ये मार्गदर्शनाचे काम तिच्याकडे असेल. तिच्यासोबत विविध ३० अजून फार्महँडस असणार आहेत. या प्रत्येकाकडे वेगळे कौशल्य असेल, यात शेती, बेकिंग, हस्तकला अशा गोष्टी असतील.

यावेळी अजून एक भारी गोष्ट असेल ती म्हणजे तिन्ही ऋतू उपलब्ध असतील. खेळणाऱ्यांना हवामानाचा अंदाज पण कळणार आहे ज्यानुसार त्यांना आपले पीक घेता येईल किंवा मासेमारी करता येईल. हा गेम मोफत उपलब्ध असेल. आपल्या मित्रांसोबत तुम्ही आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा गेम खेळू शकणार आहात.

तर मग या नव्याकोऱ्या फार्मविले ३ साठी कोण कोण उत्साहीत आहे आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required