f
computer

डोकेदुखी थांबवायचे ७ नैसर्गिक उपाय....औषध घेण्यापूर्वी हे करून बघा भाऊ !!

आपल्या सर्वांनाच कधी ना कधी तरी डोकेदुखीचा त्रास होतोच. डोकेदुखी तशी फार चिंतेची बाब नसते, पण मोठीमोठी कामं या डोकेदुखीने खोळंबतात. डोकेदुखी पळवण्यासाठी आज बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. या औषधांनी डोकेदुखी थांबतेही, पण डोकेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी लगेचच औषध घेणं बरोबर आहे का ? तर नाही. नैसर्गिक उपायांनी डोकेदुखी सहज बरी होऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीवर काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. चला तर पाहूया !!

 

१. कॅफेन

कॅफेन हा अन्नपदार्थांमध्ये आढळणारा घटक आहे. आपल्या रोजच्या चहा आणि कॉफी मध्ये कॅफेन आढळतो. कॅफेनमुळे मेंदूची मरगळ झटकली जाते आणि आपल्याला ताजतवानं वाटत. म्हणून तर आपल्याला चहा आणि कॉफीचं व्यसन लागतं. डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कॅफेन तुमचा त्रास कमी करायला मदत करू शकतो. डोकेदुखी असेल तर चहा किंवा कॉफी ब्रेक हा उत्तम उपाय आहे.

२. पुरेशी झोप घ्या

अपुरी झोप म्हणजे समस्यांना आमंत्रण असतं. डोकेदुखी पण त्यापैकीच एक. ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्तींना डोकेदुखीचा सर्वाधिक त्रास होतो. पण याचा अर्थ जास्त झोपल्याने सगळ्या समस्या दूर होतात असंही नाही बरं. जास्त झोप घेतल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. म्हणून प्रमाणात झोप घ्या.

३. भरपूर पाणी प्या

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. दिवसभरात भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने शरीराला इतरही फायदे होतात. पाण्याचे घटक जास्त असलेले अन्नपदार्थ खाल्ल्यानेही फायदा होतो.

४. तेल मसाज

कानशिलाजवळ तेलाने हलका मसाज केल्यास डोकेदुखी थांबू शकते. यासाठी साधं खोबरेल तेलही वापरता येऊ शकतं.

५. स्क्रीन ब्राईटनेस प्रमाणात ठेवा

डोके दुखीचा त्रास सुरु झाल्यास सर्वात आधी कम्प्युटर, मोबाईल पासून ब्रेक घ्या. तुमच्या रूम मधल्या लाईट्स ऑफ केल्यास आणखी फायदा होऊ शकतो.

शास्त्रज्ञांनी कम्प्युटर, मोबाईलच्या ब्राईटनेस संदर्भात काही नियम घालून दिले आहेत. ६०० लुमिन्स पेक्षा जास्त ब्राईटनेस डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतो.

६. बर्फ आणि टॉवेलचा उपचार

संशोधनात असं आढळून आलंय की डोक्याच्या ज्या भागात त्रास होत आहे त्या भागावर बर्फाची पिशवी ठेवल्यास त्रास कामी होती. जर ताणतणावामुळे डोकं दुखत असेल तर अशावेळी उबदार टॉवेलने डोक्याला शेक दिल्यास डोकेदुखी कमी होते. या दोन्ही उपायांमुळे स्नायूंना आराम मिळतो.

७. व्यायाम

आता तुम्ही म्हणाल डोकेदुखी आणि व्यायामाचा काय संबंध ? संबंध आहे भाऊ. शरीराची कमीतकमी हालचाल होत असेल तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायामाची सवय लावा.

 

तर मंडळी, पुढच्यावेळी जेव्हा डोकेदुखीचा त्रास होईल तेव्हा आधी हे उपाय करून बघा आणि मग औषध घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required