अंमली पदार्थ विरोधी अभियान : भाग ४ – झोलपिडेम!!

‘एम.डी.’ किंवा ‘म्याव म्याव’ या अंमलीपदार्थाबद्दल आम्ही तुम्हाला या लेखात माहिती दिली होती. पण त्याही पुढे जात आणखी एका नव्या अंमली पदार्थाचा शोध ड्रग्स विक्रेते आणि व्यसनाधीन या दोघांनीही मिळून लावलाय. आपण आज याच नव्या अंमली पदार्थाविषयी माहिती घेऊ. पाहूया याबद्दल सुहास गोखले काय म्हणतायत !!

झोलपिडेम : एक नवा शत्रू !

अंमली पदार्थ विक्रेते आणि व्यसनीही नवनवीन नशेच्या शोधात असतात. 2005-06 च्या सुमारात केटामाईनवर बंदी आल्यानंतर 2013 मध्ये 'मेफेड्रॉन' वापरात आले. 5 फेब्रुवारी 2015 रोजी मेफेड्रॉनवर बंदी आल्यानंतर आता मंडळींनी झोलपीडेम शोधले आहे.

वास्तवीक झोलपिडेम हे ड्रग निद्रानाशावर वापरले जात असले, तरी त्या ड्रग बाबत खूप काळजी घ्यावी लागते व ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घेतले जावे. जगात अनेक देशात या ड्रगवर यापूर्वीच बंदी घातलेली आहे. त्यामुळे भारतातून या कॅप्सुल निर्यात करण्याचा प्रयत्न कोलकाता एन.सि.बी.नी हाणून पाडला आहे. मात्र याचा स्थानिक वापर सुरू होण्याचीही शक्यता नकारता येत नाही. या गोळ्या केमिस्टकडे मिळत असल्या तरी त्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय देऊ नयेत अशा सुचना आहेत.  मात्र हे ड्रग स्वस्त असल्याने आणि त्याची नशा जास्त तीव्र आणि जास्त काळ टिकणारी असल्याने याचा वापर येत्या काही काळात याचा प्रसार झपट्याने होण्याची शक्यता आहे.

स्रोत

सध्याच्या परीस्थितीतसाठी हे ड्रग औषधे व प्रसाधने अधिनीयमाच्या शेड्युलमध्ये अंतर्भुत असले तरी ते अंमली पदार्थ विरोधी अधिनीयमाच्या परिशिष्ठात अंतर्भुत झाल्याशिवाय त्याचा गैरवापर थांबणार नाही. या ड्रगच्या वापरामुळे गर्भवती महिला किंवा अपत्यप्राप्ती प्रयत्नशिल असलेल्या महीला तसेच बाळाला अंगावरा पाजणाऱ्या महिला, ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा झोपेत काही काळ श्वासोच्छवास थांबण्याचा 'ऍपोनिआ' हा विकार असलेल्या व्यक्ति, स्नायुंची अशक्तता असलेल्या किंवा 'मायस्थेनिआ ग्रॅव्हिस' हा विकार (कुली चित्रपटाच्या चित्रीकरण काळात झालेल्या अपघातामुळे श्री.अमिताभ बच्चन यांना मृत्युच्या दाढेपर्यंत नेणारा आजार) असलेल्या व्यक्ति, पुर्वी ड्रग किंवा अल्कोहोल व्यसन असलेल्या व्यक्ती इतर कोणती औषधे घेणाऱ्या व्यक्ति यांच्यावर झोलपीडेम चे परीणाम अत्यंत विपरीत होतात.

दुःखाची बाब म्हणजे, कलम 77 अं.प.वि.अधिनीयमामुळे, अंमली पदार्थ विरोधी अधिनीयमाच्या प्रतिबंधीत ड्रग्जच्या यादीत एखाद्या ड्रगचा अंतर्भाव होण्याची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत जाणारा काळ अतिशय नुकसानदायक आणि दिर्घ असल्याने नाताळाच्या आणि नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांच्या काळात हे ड्रगधुमाकुळ घालण्याची दुःचिन्हे दिसत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required