तुम्ही माऊथवॉश वापरता का ? जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे!

दातांच्या आरोग्यासाठी आपण पूर्वी लिंबाच्या काडीचा वापर करायचो. नंतर दंतमंजन आले, त्यानंतर टूथपेस्ट आणि ब्रश आले आणि त्यांनी आपल्या घरात स्थान मिळवले. असे नवनवीन प्रॉडक्ट्स काळानुरूप बाजारात दाखल होतच असतात. आता गेल्या काही वर्षात अश्याच एका नवीन प्रॉडक्टची जाहिरात आजकाल टिव्हीवर सारखी झळकताना दिसत आहे… माऊथवॉश! चला तर मग जाणून घेऊया माऊथवॉश नेमके आहे काय आणि याचे फायदे तोटे काय आहेत...

स्रोत

माऊथवॉश वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. जसे की, दातात कीड लागू नये म्हणून, श्वासात तजेला यावा म्हणून आणि दातांवरचे कीटण कमी व्हावे म्हणून. तसेच माऊथवॉश हिरड्या आणि दात मजबूत व्हावे यासाठी सुद्धा वापरले जाते. 

माऊथवॉश नक्की कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला त्यातील घटक कोणते आहेत ते जाणून घ्यावे लागेल. यात असतात स्वच्छता करणारे घटक, पाणी, अल्कोहोल आणि फ्लेवर येण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स. याशिवाय प्रत्येक कंपनीच्या माऊथवॉश बनवण्याच्या पद्धतीनुसार काही घटक बदलत असतात. जसे की,

स्रोत

1. फ्लूरॉईड जे दातांची झीज रोखते.
2. अँटीमायक्रोबिअल्स जे हानिकारक बॅक्टेरियांची तोंडात होणारी वाढ रोखण्यास मदत करतात.
3. तोंडाची दुर्गंध कमी करण्यात मदत करणारे मीठ.
4. इतर काही केमिकल पदार्थ.

आता जाहिरातीत कंपन्या दावे करतात की माऊथवॉश वापरण्याचे बरेच फायदे आहेत. तर नेमके काय आहेत याचे फायदे? 

स्रोत

1. हिरड्यांच्या रोगापासून वाचवते - हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी माऊथवॉश उपयोगी आहे. हानिकारक बॅक्टरीयामुळे होणारे दातांवर परिणाम तसेच किटण कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. 
2. दातांमधील पोकळी कमी करते - माऊथवॉश मध्ये फ्लूरॉईड असते. हे फ्लूरॉईड दातांमध्ये ‘कॅव्हिटी’ तयार करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करते. 
3. दाढदुखीच्या वेदना कमी करते - माऊथवॉश वेदनाशामक म्हणून काम करते. दाढ, दात, हिरड्या दुखत असतील तर त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी माऊथवॉशचा उपयोग होतो.

याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत. जाणून घेऊया…

1. यामध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे काहीजणांना उलटा परिणाम सुद्धा होऊ शकतो. तोंडात जखमा असतील तर अल्कोहोल मुळे इरिटेशन होऊ शकते.

स्रोत

2. सर्वात मोठा तोटा आणि धोका म्हणजे कॅन्सरची भीती! काही माऊथवॉश मध्ये तोंडाचा कॅन्सर निर्माण करणारे केमिकल्स वापरले असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलेही माऊथवॉश घेताना त्यातील घटक बघूनच विकत घेणे क्रमप्राप्त आहे.

स्रोत

एकंदरीत काय, तर तोट्यांचा विचार करून त्यांना टाळता येत असेल तर माऊथवॉश वापरण्यात काही वाईट नाही. पण एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे, माऊथवॉश हे दात घासण्याला पर्याय असू शकत नाही. रोज दात व्यवस्थित घासण्यासोबत माऊथवॉश वापरल्यास चांगला फायदा होऊ शकतो. 

सर्वात महत्वाचे म्हणजे दात, हिरड्यांमध्ये काही समस्या असल्यास त्वरित डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेणे हेच उत्तम!

सबस्क्राईब करा

* indicates required