उत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या ई-जीवनसत्वाचे फायदे !!

आपण अ,ब ,क , ड जीवनसत्वांबद्दल आपल्या शाळेत शिकला असालच.  पण ई जीवनस्त्वाबद्दल फारशी माहिती आपल्या शाळेच्या पुस्तकात दिलेली नसते.  कारण सरळ आहे,  गेल्या काही वर्षांपर्यंत या जीवनसत्वाच्या गुणधर्माबद्दल उपलब्ध माहितीच कमी होती. आता या ई जीवनसत्वाबद्दल अधिक संशोधन झालंय मंडळी. आता आपल्या अन्नातून शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्वांचे आठ प्रकार शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. या आठ प्रकारांपैकी फक्त एकच प्रकार म्हणजे अल्फा टोकोफेरॉल  मानवी शरीराला उपयुक्त असतो. बाकीचे सर्व प्रकार तसे काही फारसे कामाचे नसतात. तसं पह्यलं तर   अन्न आतड्यात पोहचलं, की त्यातून ई जीवनसत्व शोषलं जातं. म्हणजे तेव्हा ई जीवनसत्वाचे सरसकट सगळेच आठ प्रकार शोषले जातात. या पुढचं काम यकृताचं असतं. यकॄत फक्त अल्फा टोकोफेरॉल या प्रकारचे ई जीवनसत्व साठवून ठेवतं आणि बाकी अनावश्यक प्रकार लघवीतून बाहेर फेकले जातात.

हे अल्फा टोकोफेरॉल  इतकं का महत्त्वाचं आहे ??

स्रोत

अल्फा टोकोफेरॉल शरीराच्या पेशींमध्ये होणार्‍या "ऑक्सिडेशन" वर ताबा ठेवतं. त्यामुळं  फ्री रॅडीकल्सचं शरीरातलं  प्रमाण कमी होतं. हे फ्री रॅडिकल्स शरीरात अधिक असतील तर आपल्या पेशी चंगलं काम करु शकत नाहीत आणि काहीवेळा त्या मरूनही जातात. म्हणून साखळी प्रक्रियेनं तयार होणाऱ्या या फ्री रॅडीकल्सच्या संख्येवर मर्यादा असणं आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. तसंच या अल्फा टोकोफेरॉल  शरीराला येणारी सूज कमी होते. हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, या रोगांपासून बचाव करण्यासाठी ई जीवनस्त्व अशा बऱ्याच प्रकारे मदत करत असतं. अर्थातच इथं एक बाब लक्षात घ्यायला हवी. धूम्रपान, अल्ट्राव्हायोलेट किरण आणि प्रदूषण यामुळं फ्री रॅडीकल्स वाढत असतात. केवळ ई जीवनसत्व याचा मुकाबला करू शकत नाही.  त्यामुळं निरोगी आरोग्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणं ही पण तितकंच महत्वाचं आहे. 

ई जीवनसत्त्वामुळं शरीराला काय काय लाभ होतात हो ?

मधुमेहामुळे शरीराला जुनाट सूज आणण्याची खोड असते, ती पण ई जीवनसत्वामुळे कमी होते. शरीरातल्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट म्हणजेच एक प्रकारच्या रक्तपेशी अडकून राहीलेल्या असतात, त्याचा निचरा करण्याचे कामही हेच जीवनसत्व करते. अल्झायमर म्हणजेच पूर्ण स्मृतिभ्रंश, मिरगी म्हणजे एपीलेप्सी, पार्किन्सन यासारख्या वंशपरंपरागत रोगांमुळं मेंदूची होणारी घसरण पण  या जीवनसत्वामुळं कमी होते.

स्त्रियांना ई जीवनसत्त्वामुळं आणखी काय लाभ होतात ?

स्रोत

स्त्रियांसाठी हे जीवनसत्व फारच महत्वाचं आहे. मासिक पाळीपूर्वी होणार्‍या ओटीपोटातल्या वेदना, अचानक अंगाला जाणवणार्‍या गरम लाटांच्या संवेदना अशा त्रासांपासून ई जीवनसत्त्वामुळं बचाव होतो.   गर्भार स्त्रियांचा अचानक वाढणारा रक्तदाब आणि त्यामुळे काही वेळा येणारी फीट हे त्रासही कमी होतात. चेहेर्‍यावर येणार्‍या सुरकुत्यासुद्धा ई जीवनसत्वामुळे नाहीशा होतात, कांती सतेज होते.   म्हणून चेहेर्‍याला लावायच्या अनेक क्रीममध्ये ई जीवनसत्वाचा वापर केला जातो. इतकंच नव्हे तर केसांच्या गळतीला पण आळा घालण्याचे काम ई जीवनस्त्व करतं.

वृद्धांसाठी ई जीवनसत्त्व कसं महत्त्वाचं आहे ?

स्रोत

आहारात या जीवनसत्वाचा अंतर्भाव केला,  तर वृध्दत्वामुळे होणाऱ्या  मोतीबिंदू, मॅक्युलर डीजनरेशन ( डोळ्याच्या अंतर्भागाचा एक हिस्सा)  यांसारख्या डोळ्यांच्या विकारांपासून बचाव होतो. नियासीन म्हणजे बी-३ या  जीवनसत्वासोबत जर ई जीवनसत्व घेतलं तर कोलेस्टोरॉलचं प्रमाण कमी होतं.  

हे झाले या जीवनसत्वाचे गुणधर्म.  पण आपल्या आहारातून ते मिळवण्यासाठी काय करायचे ते आता पाहूया !!

कोंडा न काढलेली धान्यं, वेगवेगळ्या प्रकारच्या उदा. भोपळ्याच्या- टरबूज कलिंगडाच्या बिया, सुकामेवा, बिनसायीचं दूध, वनस्पती तेल, ताज्या पालेभाज्या, अंडी , मासे या सर्व प्रकारच्या अन्नात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. 

म्हणजेच मंडळी, हे जीवनसत्त्व मिळवण्यासाठी ढीगभर औषधं खायची गरज नाही. त्यापेक्षा ते सहज आपल्या रोजच्या आहारातून मिळवणं जास्त श्रेयस्कर आहे.  हो ना? तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required