computer

कोरोना झाल्यावर जिभेची चव जाते म्हणतात पण इतकी? हा व्हिडीओ एकदा पाहाच !!

कोरोनाची जे काही लक्षणे सांगितली गेली, त्यापैकी एक म्हणजे चव जाणे! म्हणजेच कोरोना झाल्यावर जिभेची चव जाण्याची पूर्ण शक्यता असते.  अर्थात प्रत्येक कोरोना रुग्णाची चव जातेच असेही नाही. पण कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर रुग्णांना जिभेला चव जाणवते का असा प्रश्न विचारण्यात येतो. जिभेला काहीच न जाणवणं किती प्रमाणात असू शकतं याचं प्रात्यक्षिक एका टिकटॉकरने नुकतंच दाखवलं आहे. 

रसेल डॉनली असे या टिकटॉकरचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तो कोरोना पॉजिटीव्ह असल्याचं समजलं होतं. त्याचबरोबर त्याच्या जिभेला चव जाणवणं पूर्ण बंद झालं होतं. कोरोना झाल्यामुळे तो आयसोलेशनमध्ये होता. यावेळी त्याने काही व्हिडीओज शेअर केले. या व्हिडीओमध्ये तो जिभेला चरचरीत लागतील असे पदार्थ खाताना दिसत असे. पण जिभेला चव जाणवत नसल्यामुळे त्याच्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाहीय. 

एका व्हिडीओत तो कांदे कापून खाताना दिसत होता, त्याच्या चेहऱ्यावर आपण कांदे खात आहोत असा कुठलाही भाव दिसत नव्हता. पुढच्याच सेकंदाला तो लिंबू सरबत पिताना दिसला, तर दुसऱ्याच क्षणी लगेच चमचाभर आल्याची पेस्ट देखील खाल्ली. त्याने सांगितले की, "मी कोरोना पॉजिटीव्ह असल्यामुळे मला कुठलीही चव कळत नाहीये, मला अनेकांनी ओंगळ असे काहीतरी खाण्याचा सल्ला दिला, घरात असे काही नसल्याने मग मी झणझणीत पदार्थ खाण्याचा विचार केला. त्यानंतर वरील अनुभव त्याला आला."

पहिला व्हिडीओ झाल्यावर त्याने परत दुसरा व्हिडीओ बनवला. त्यात तो आधी एक ग्लास ऑरेंज ज्यूस पिताना दिसत आहे. लगेच balsamic vinegar, apple cider vinegar तसेच लिंबू खाताना दिसत आहे. एवढे करूनही त्याला कुठलीही चव जाणवत आहे असे वाटत नाही. तो म्हणतो की चव जाणवत नसली तरी पोटात सगळं कळते. 

तो म्हणतो की, "कांदा आणि आलं खाऊन देखील विशेष अशी चव मला जाणवतच नव्हती." लिंबूचा रस बराच वेळ तोंडात राहू दिल्यावर आंबटसे खाल्ल्यावर जसा चेहरा होतो, तसा त्याचा चेहरा झाला होता. त्याचा हा व्हिडीओ १.३ कोटी लोकांकडून बघितला गेला आहे. जगभरात हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required