युट्युब व्हिडीओ बघून बाळाला जन्म देत होती आणि.....वाचा पुढे काय झालं.

मंडळी, युट्युबच्या व्हिडीओ जगतात जवळजवळ प्रत्येक गोष्टीचे ट्यूटोरियल्स सापडतात. मोबाईल बंद पडला तर काय करायचं, अमुक पदार्थ कसा बनवायचा, जादूचे प्रयोग कसे करायचे, मेकअप कसा करायचा, एवढंच काय श्रीमंत होण्याच्या टिप्स पण मिळतात. या व्हिडीओज मधून काही प्रमाणात आपण ज्ञान मिळवू शकतो, पण काही गोष्टी अशा असतात ज्या युट्युब व्हिडीओ मधून शिकता येत नाहीत. त्यासाठी एका तज्ञाचीच गरज असते.

स्रोत

युट्युबवर मुलाला जन्म देण्याचे विचित्र व्हिडीओज आहेत. काही व्हिडीओजतर बाळाला स्वतःहून जन्म कसा द्यायचा हे शिकवतात. खरं तर हा एक घातक प्रकार आहे. या पद्धतीने बाळाचा आणि आईचा दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. या व्हिडीओला गोरखपूरच्या एका मुलीने गंभीरपणे घेऊन फार मोठी चूक केली. तिने युट्युब व्हिडीओ बघून बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिचा तर जीव गेलाच पण नवजात बाळही दगावलं.

काय आहे हे प्रकरण ?

स्रोत

तिचं नाव लपवण्यात आलं आहे. ती मुळची उत्तरप्रदेशच्या बहराईच येथे राहणारी होती. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ती गेल्या ४ वर्षांपासून गोरखपूर मध्ये राहत होती. घटनेच्या ४ दिवसांपूर्वी तिने एक रूम भाड्याने घेतली. घर मालकाला तिने सांगितलं की तिची आई काही दिवसातच तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाईल.

४ दिवसांनी ती घरात मृत आढळली. तिच्या बाजूलाच तिचं मेलेलं बाळ होतं. शेजारीच ब्लेड आणि कात्री पडली होती आणि जमीन रक्ताने भरलेली होती. तिच्या मोबाईल मध्ये ‘how to deliver baby by self’ अशा पद्धतीचा व्हिडीओ प्ले केलेला होता.

स्रोत

तिने स्वतःहून बाळाला जन्म द्यायचं का ठरवलं याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण असा अंदाज आहे की लग्नाच्या अगोदर दिवस गेले असल्याने तिने भीतीपोटी हा धोका पत्करला.

मंडळी, युट्युबवर असे आणि आणखी बरेच विचित्र व्हिडीओ आहेत. सगळ्याच व्हिडीओजना गंभीरपणे घेतलं जाऊ शकत नाही. नाही तर असा भयानक प्रकार घडू शकतो. काही महिन्यांपूर्वी बंगलोरच्या एका माणसाला यूट्यूबवरचे ऑपरेशन्स पाहून आपणही यशस्वी ऑपरेशन करू शकू असं वाटलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला त्यासाठी परवानगी दिली नव्हती. रीतसर शिक्षण घेणं आणि इंटरनेट वरचं वाचून स्वतःला अतिशहाणं समजणं यात खरंच फरक आहे मंडळी.

सबस्क्राईब करा

* indicates required