computer

वजन कमी करायचं आहे ? मग हे धान्य तुमची इच्छा लगेच पूर्ण करेल !!

मंडळी, वजन कमी करायचं असेल, तर उपाशी राहणं हा पर्याय असू नाही. उपाशी राहिल्याने उलट तुमचं वजन आणखी वाढण्याची शक्यता असते. अभ्यासकांच म्हणनं आहे, की तुम्ही फार काळ उपाशी राहिलात तर तुम्हाला तेवढीच भूक लागणार. अशावेळी गोड किंवा खारट पदार्थांकडे तुम्ही ओढले जाऊ शकता. म्हणजे काय, तर ‘येरे माझ्या मागल्या’... मग करायचं काय ? वजन कमी कसं करायचं ? आज आम्ही सांगणार आहोत वजन कमी करण्याचा एक सर्वोत्तम पर्याय.  

‘जवस’ (अळशी) हे धान्य वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतं !! ते कसं ? चला खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया !!

१. भरपूर प्रथिने

जवस हे प्रथिनयुक्त असतं. कोणकोणती प्रथिने ? तर, अमीनो ऍसिड आर्जिनिन, ऍस्पॉर्टरिक आणि ग्लूटामिक. ही प्रथिने २ महत्वाच्या भूमिका बजावतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वजन सहजगत्या आटोक्यात येतं. दुसरा मुद्दा असा, की या प्रथिनांनी ‘भूक कमी करणाऱ्या’ हार्मोन्सचा स्तर वाढतो. तुमची भूक आटोक्यात आली की वजन कमी व्हायला कितीसा वेळ लागेल भाऊ !!

२. फायबर्स चा उत्तम स्रोत

जवसामध्ये असलेल्या काही विशिष्ट फायबर्समुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं, तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण आटोक्यात राहतं आणि प्रथिने जी कामगिरी बजावतात तीच फायबर्सही बजावतात – तुमची भूक आटोक्यात येते !! फायबर्सच्या विघटनाला वेळ लागतो त्यामुळे होतं असं, की आपल्याला पोट भरलेलं आहे असा भास होतो.

३. जवस मेदयुक्त आहे

वजन कमी करताना मेदयुक्त पदार्थ म्हणजे ज्यामुळे चरबीत वाढ होते अशा पदार्थांना कायमचं टाळलं पाहिजे असा एक समज आहे, पण मेद हा घटक तुमच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतो. जवसामध्ये ५८% असलेले 'ओमेगा-३' हे मेदाम्ल तुमच्या वजनात भर घालत नाही, तर उलट वजन वाढवणाऱ्या ‘ट्रायग्लिसरायड्स’ या मेदाचं प्रमाण कमी करतं.

आहारात जवस कसे समाविष्ट कराल ?

जवस हे धान्य असल्याने ते भिजत ठेवून मोड आलेले जवस खाणे उत्तम. आपल्याकडे फार पूर्वीपासून जवसाच्या पिठाची चटणी केली जाते. (विदर्भात जवसाचे तेलही वापरतात) अशा प्रकारे जवस दळून खाता येऊ शकतं. याशिवाय सलाड, दही, ओट्स सोबत जवस खाल्ल्यास आरोग्यास फायदा होतो.

 

तर मंडळी, अशाप्रकारे जवस सारख्या धान्याने तुमचं वजन आटोक्यात येऊ शकतं. वजन कमी करण्याची गरज असलेल्या आपल्या मित्रांना tag करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required