तुम्हांला माहित आहे का, रक्तदाबावरचे पहिलं नैसर्गिक औषध १९३४ साली भारतात तयार झाले ते?

आज जागतिक फार्मा डे आहे,  त्यानिमित्ताने  ही माहिती ख़ास बोभाटाच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत..
१९३० सालची ही गोष्ट आहे. मनान नावाचे गृहस्थ काही कामानिमित्त ब्रह्मदेशातल्या जंगलात फिरत होते. त्या वेळी ब्रह्मदेशातल्या सागवानी लाकडाला-BTCला- फार मोठी मागणी होती. जंगलातून तोडलेल्या ओंडक्यांची वाहतूक हत्तीवरून व्हायची.  काही वेळा हे हत्ती अचानक बिथरायचे. अशा वेळी रागावलेल्या हत्तीला शांत करण्यासाठी माहूत एका विशिष्ट झाडाचा पाला खायला घालायचे आणि हत्ती शांत व्हायचे.
मनान यांनी हे निरिक्षण नोंदवले आणि ती वनस्पती शोधून अभ्यास सुरु केला आणि त्यांच्या लक्षात आले की या वनस्पतीचे मूळ  उच्च रक्तदाबावर रामबाण औषधासारखे काम करते.
Rauwolfia serpentina असे शास्त्रीय नाव असलेल्या या वनस्पतीपासून जगातलं पहिलं नैसर्गिक तेही  वनस्पतीपासून तयार केलेलं औषध "सर्पीना" जन्माला आले आणि सोबत जन्म झाला हिमालया फ़ार्मास्यूटीकल या कंपनीचा!

स्रोत


यानंतर अनेक वनस्पतींचा मागोवा घेत हिमालयाची नविन औषधे बाजारात आली आणि आजही अनेक एलॉपथीचा अभ्यास करणारे डॉक्टर हिमालयच्या आयुर्वेदीक औषधाचा पुरस्कार करतात.
हिमालयाची काही औषधे घराघरांत परिचयाची आहेत.
सिस्टोन - किडनी स्टोनसाठी, लिव्हरसाठी Liv 52, लहान बाळांसाठी बोनिसान तर सध्या सोशल मिडीयावर स्वाइन फ्लू साठी फेमस झालेले सेप्टेलीन ही हिमालयाचीच उत्पादनं आहेत. 
आयुर्वेद आपलयासाठी किती मोठा धन्वंतरी  ठेवा आहे याचा प्रत्यय हा किस्सा वाचून आला असेलच!