computer

थकून आल्यावर बूट न काढताच घरात येताय ? मग हे वाचाच !!

मंडळी सहसा लोकांचे आता बाहेर फिरण्याचे आणि घरात घालण्याचे चप्पल वेगवेगळे असतात. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर फिरणारे लोकं बाहेर बूट तर घरात चप्पल घालून वावरत असतात. तर मंडळी बऱ्याच लोकांना बूट काढण्याचा लई म्हणजे लईच कंटाळा राव!! ते बाहेरून आले की घरात बूट न काढता थेट घुसतात. स्वतःच्या घरात तरी एकवेळ ठीक पण दुसऱ्याच्या घरात सुद्धा बरेच महाभाग बूट न काढता जातात. तुम्ही म्हणाल मग काय झाले राव!! एवढं तेवढं चालवून घ्यावे. मंडळी चालवून घ्यायला पाहिजे जर यातून काहीही नुकसान होत नसेल तर!! पण मंडळी यातून जर काही समस्या निर्माण होत असतील तर काळजी घ्यायला हवी ना? 

बाहेर फिरताना आपण रोजच्या कितीतरी ठिकाणी जात असतो. पार्किंग लॉट्स, बाथरूम्स, फुटपाथ, पायऱ्या, कधी कधी घाण जागेतून सुद्धा चालणे होते. तर मंडळी तुम्ही जेव्हा अशा जागी जाता तेव्हा दरवेळी त्या जागेचा थोडाफार अंश सोबत घेऊन येत असता. आणि हेच नाही जिथे जाता तिथे तुमच्या बुटाला लागलेली घाण सोडून येत असता. पण हे समजणार नाही मंडळी!! कारण जी घाण तुमच्या बुटांना लागते ती कचऱ्याच्या रूपात नसते तर बॅक्टेरियाच्या रूपात असते. 

2015 साली झालेली ही रिसर्च  मायक्रोबायोम नावाच्या एका जर्नलमध्ये छापून आली आहे. त्यांच्या रिसर्च टीमने जेव्हा सर्वे केला तेव्हा 89% लोकं जिथे जातात तिथे बुटातले बॅक्टेरिया सोडून येतात असे दिसले. 

याचा अर्थ बाहेरील बॅक्टेरिया थेट तुमच्या घरापर्यन्त येत असतो. तुम्ही म्हणाल सगळेच बॅक्टेरिया काही धोकादायक नसतात. हे खरे आहे मंडळी सगळे बॅक्टेरिया धोकादायक नसतात पण आधीच काळजी घेतलेली कधीही चांगली नाही का? नाहीतर बऱ्याच वेळा सगळी स्वच्छता पाळून सुद्धा घरात एखादा आजारी पडतो तेव्हा आपण विचार करतो सगळी स्वच्छता ठेऊन पण यांना इन्फेक्शन कसे झाले तर त्याचे अशा ठिकाणी आपण केलेले दुर्लक्ष जबाबदार असते राव!!

2017 साली हॉस्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या रिसर्च मध्ये असे दिसून आले की, 26 टक्के बूटं सोबत क्लोस्ट्रीडियम डिफिसाईल वागत असतात ज्याने डायरिया सारखे रोग होण्याचा धोका असतो. अजुन काही संस्थांनी केलेल्या रिसर्च मध्ये सुद्धा त्यांना याच प्रकारे बाहेरचे बूट घरात घालण्याने होणारे दुष्परिणाम दिसले आहेत.
 
सहसा वय वाढल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सहसा हानिकारक नसलेले बॅक्टेरियाने काहीच होत नाही. पण लहान मुलांना इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून बुटांमध्ये असलेल्या काही बॅक्टेरिया वयस्कर लोकांना काही करू शकत नसले तरी लहान मुलांवर त्याचा इफेक्ट् पडू शकतो. म्हणुन एवढी सगळी काळजी तुम्ही नेहमी घेत असालच तर अजून थोडी काळजी घेणे कधीही चांगले. 

मंडळी म्हणून स्वतःच्या घरात कितीही थकून घरी आले तरी आधी बूट काढून ठेवले तर नंतर होणारे आजारपण टाळता येऊ शकते. आणि सहसा दुसऱ्याच्या घरी जाताना पण हीच सावधानी बाळगली तर त्यांच्या घरी सुद्धा होणारा धोका टळू शकतो. जेव्हा कुणी तुमच्या घरात बूट न काढता थेट घुसेल तेव्हा त्याला प्रेमाने बूट काढायला सांगणेच योग्य!! त्या व्यक्तीला सुद्धा या गोष्टीबद्दल माहिती झाली तर तो सुद्धा भविष्यात सुधारणा करेल. नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required