बहुगुणी मध- जाणून घ्या आयुर्वेद काय म्हणतो..

दुधापासून उत्पन्न होणार्‍या पदार्थांत जे महत्त्व तूपाला आहे तितकंच महत्त्व वनस्पतीजन्य पदार्थांत मधाला आहे. मधामध्ये वनस्पतींचं सार उतरतं असं आयुर्वेद मानतो.  हल्ली  डॉक्टर आणि डाएटिशिअन्स पौष्टीक अन्न  म्हणून मध खा असं सांगतात.  पण आयुर्वेदानं मधाला पौष्टीकतेपेक्षा विविध रोगांमध्ये हितकर आणि म्हणूनच उपयोगी मानलंय.

मग जाणून घ्यायचंय, मधाचे गुणधर्म काय आहेत आणि त्याचा उपयोग कोणकोणत्या रोगांमध्ये कसा होतो ते? तर मग हे वाचाच. आणि हो, हे गुणधर्म आम्ही नाही, आपला वर्षानुवर्ष चालत आलेला आयुर्वेद सांगतो आहे.

१.  मध गुणानं रुक्ष आणि म्हणूनच वातकारक मानण्यात आलेला आहे. 

२.  आपल्या अंगात बरेचदा चरबी वाढते. ती कमी होण्यासाठीसुद्धा मध उपयुक्त आहे.  मधाच्या रुक्षतेमुळं  शरीरातल्या जास्तीच्या वाढलेल्या गाठी घासून आटोक्यात ठेवण्याच्या कामात खूपच उपयोगी पडतो.

३.  फक्त चरबी कमी करण्यासाठीच नाही, तर डोळ्यांच्या आजारांमध्येही मध हितकारी मानला जातो. डोळ्याच्या आजारांत वैद्य मध डोळ्याला बाहेरून लावा असं सांगतात आणि  बरेचदा मध खाल्ल्यानंही डोळ्यांचे आजार लवकर बरे होतात. 

स्त्रोत

४. कधी कधी खूपच तहान लागते, शरीरातून रक्तस्राव होतात,  तर कधी पित्तातून रक्तही पडतं. या सगळ्या रोगांना आयुर्वेद पित्तप्रधान रोग म्हणतो. मध हा या सार्‍या आजारांवर गुणकारी आहे. 

५. मधुमेह, कफ, दमा, त्वचारोग, खोकला हे रोग कफप्रधान मानले जातात. या रोगांतही औषध म्हणून मध महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

६. चवीला तसा गोड असला तरी मध बराचसा तुरट आणि रुक्ष असतो. या गुणामुळं उलटी होणं, पोटातले जंत, हगवण या रोगांत औषध म्हणून आणि अशा रोगांच्या वेळेस पिण्यासाठी म्हणूनही मध उपकारक आहे. 

स्त्रोत

७. मध शरीरातली जादा चरबी आणि जास्तीच्या वाढलेल्या गाठी घासून कमी करत असला तरी त्याचा हा गुणधर्म शरीरावरचे व्रण कमी होण्यासाठीही उपयोगी पडतो.  मधामुळं व्रण म्हणजे जखम शुद्ध होऊन  लवकर जुळून येण्यास हातभार लागतो.

८. फक्त मधच नाही, तर  मधापासून मिळणारी साखरही या सगळ्या आजारांवर गुणकारी आहे.

९. मधुमेहग्रस्तांसाठी कोणत्याही वेळी आणि एरवी उन्हातून फिरल्यानंतर मध-पाणी उपयुक्त असतं.

१०. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणा-यांसाठी मध-लिंबाचा रस-गरम पाणी, हे मिश्रण उत्तम काम करतं.

पण हो,  मधात इतक्या सगळया गोष्टी आहेत म्हणून सारखा सारखा मध खाऊन चालायचा नाही बरं का.  मध उष्ण ऋतूमध्ये उष्ण पदार्थांबरोबर किंवा गरम करून वापरल्यास त्यापासून अपाय होतो असं मानलं जातं. ’अति तिथं माती’ हे तर आपल्याला माहित आहेच. तेव्हा योग्य प्रमाणात रोज थोडा मध खा आणि निरोगी राहा..

सबस्क्राईब करा

* indicates required