computer

मुंबईकरांनो, मुंबईतील पाणी आहे सर्वात शुद्ध.....आता फिल्टर न करता पिता येणार पाणी !!

मुंबईकरांनो, आपण सगळेच पाणी उकळून किंवा फिल्टर करून पितो, कारण नळातून येणारं पाणी तसंच प्यायलो तर आजारी पडण्याची शक्यता असते. खास करून पावसाळ्यात हा धोका असतो. राव आता ही चिंता करण्याची गरज नाही, कारण मुंबईतल्या नळाचं पाणी हे आता जागतिक दर्जाचं झालं आहे. म्हणजे आता प्युरीफायरची छुट्टी !!

मंडळी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत रोज मुंबईतल्या पाण्याचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांचं परीक्षण केल्यावर अशी माहिती मिळाली की या पाण्यात “कोलिफोर्म बॅक्टेरिया” केवळ ०.७ टक्के आहे. WHO (World Health Organization) नुसार पाण्यात ०.५ टक्क्यांपर्यंत कोलिफोर्म बॅक्टेरिया असेल तर ते पाणी शुद्ध असतं. याचा अर्थ मुंबईतील पाणी जागतिक मानांकनाच्या जवळ जाणारं आहे.

मंडळी, आता मेख अशी आहे की हे पाणी शुद्ध राहावं म्हणून आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. कारण कितीही झालं तरी टाकी घाण असेल तर पाणी अशुद्ध होणारच. या बाबतीत भांडूप येथील पाणी साठा जगात भारी ठरला आहे. परीक्षणात असं आढळलं की या साठ्यातील पाणी जगातील सर्वात शुद्ध पाण्यापैकी आहे.

तर, मुंबईकरांनो पाण्याची समस्या तर सुटली, आता टाक्या स्वच्छ ठेवायचं काम नक्की करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required