कोण म्हणतं साडीत व्यायाम नाही होत? या पुणेकर बाई साडीत पुशअप आणि वेट ट्रेनिंग करतायत!!

गेल्यावर्षी मिली सरकार या जिम्नॅस्टिकपट्टूचा साडीत ब्लॅकफ्लिप करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. तिचे हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. तिचे सराईतपणे ब्लॅकफ्लिप करतानाचे व्हिडीओ पाहून साडीतअशी कामगिरी करता येते हे लोकांना नव्यानेच कळलं. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पुण्याच्या एका महिलेने साडी नेसून चांगला व्यायाम करता येऊ शकतो हे सिद्ध केले आहे.

डॉ. शर्वरी इनामदार यांचा साडी नेसून व्यायाम करतानाचा फोटो भारतात नाहीतर जगभर व्हायरल होत आहे. त्या गेली ५ वर्षे आपल्या फिटनेसवर प्रचंड काम करत आहेत. पुशअप, पूलअप, वेट ट्रेनिंग यांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विविध व्यायाम प्रकार करणे हा त्यांचा छंद असून, त्यांची फिटनेस बघून कुणाला पण कौतुक वाटेल.

पुण्यात आहारार्युवेद या नावाने त्यांचे क्लिनिक आहे. त्या सांगतात की, 'महिला दररोज साडी नेसत नाहीत. रोज साडी नेसणे कम्फर्टेबल पण असू शकत नाही. पण भारतीय महिला म्हणून जेव्हा आपण सण- उत्सव साजरे करतो, तेव्हा आवर्जून साडी नेसतो. साडी नेसणे हा महिलांना आपल्या फिटनेसकडे लक्ष न देण्याचा विषय असू शकत नाही.'

डॉ इनामदार या वेट ट्रेनिंगबद्दल प्रचंड आग्रही आहेत. प्रत्येक महिलेने आपल्या रुटीनमध्ये वेट ट्रेनिंगचा समावेश करावा असे त्या म्हणतात. वेट ट्रेनिंग हाडे आणि स्नायू मजबूत होण्यात मदत करतात. माणूस जेव्हा वेट ट्रेनिंग करतो तेव्हा आपण व्यवस्थित जेवण करतो आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेतो. 

सध्या योग आणि डान्स एक्सरसाईजवर लोकांचा भर आहे. पण वेट ट्रेनिंगचा समावेश अनेक बाजूने फायदेशीर आहे. डॉ इनामदार सांगतात की, त्यांना त्यांच्या कुटूंबाचे मोठे पाठबळ असल्यामुळे त्या या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने करू शकतात.

डॉ. इनामदार यांचा फिटनेस व्हिडीओ पाहून अनेक महिलांचा न्यूनगंड कमी होण्यात मदत होणार आहे हे मात्र खरं.

सबस्क्राईब करा

* indicates required