computer

विषाणू आणि त्याबद्दलच्या वैज्ञानिक संकल्पना तुम्हाला माहित असायलाच हव्या !!

पृथ्वीवर लाखो विषाणू मानवजातीला अजूनही अज्ञात आहेत. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जेमतेम पाच हजार व्हायरस म्हणजे विषाणूंची माहिती आपल्याला आहे. विषाणूंची बाधा तशी कोणालाही होऊ शकते. वनस्पती, प्राणी, इतकंच काय, बॅक्टेरियाला पण विषाणूंची लागण होऊ शकते. विषाणूंना घर करायला जिवंत पेशींची गरज असते. एकादा का या पेशीत प्रवेश मिळाला की त्यांची जोमाने वाढ होते.

यासंदर्भातील वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी आम्ही दोन भागात माहिती देणार आहोत. यापैकी आजच्या भागात पाहूया बॅक्टेरीओफेज, एंडोसायटोसीस, व्हायरल लेटन्सी आणि अशाच इतर संकल्पना समजून घेऊया.

बॅक्टेरीओफेज म्हणजे काय?

बॅक्टेरीओफेज म्हणजे बॅक्टीरियाच्या पेशीत प्रवेश मिळवणारे व्हायरस! आपल्याला ज्ञात असलेले बहुतेक सगळेच विषाणू बॅक्टेरिओफेज असतात. हे विषाणू प्रोटीनचे बनलेले असतात.  बॅक्टीरियाच्या पेशीभोवती असलेली भिंत मोडून ते आत प्रवेश करतात. एकदा का आत प्रवेश मिळाला की ते स्वतःचा डीएनए आणि आरएनए त्या पेशीत स्थापित करतात.

व्हायरसचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे व्हायरॉलॉजी! प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करणारे व्हायरस दोन प्रकारचे असतात. त्यामुळे व्हायरसचा अभ्यास दोन वेगवेगळ्या शाखांतून केला जातो. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या व्हायरसचा अभ्यास म्हणजे व्हेटरनरी व्हायरॉलॉजी आणि माणसाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या व्हायरसचा अभ्यास म्हणजे मेडिकल व्हायरॉलॉजी.

आता बघू या कॅप्सिड म्हणजे काय?

व्हायरसभोवतीचे प्रथिनाचे म्हणजे प्रोटीनचे कवच म्हणजे कॅप्सिड. हे कवच व्हायरसच्या गूणसूत्रांचे संरक्षण करतात. प्रत्येक विषाणूवरचे कॅप्सिड एकसारखे नसते. त्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारची असते आणि हे कवच वेगवेगळ्या प्रोटीनपासून बनलेले असते.

काही कॅप्सिडभोवती लिपिडची खोळ असते. या खोळीला व्हायरल एन्व्हलप असे म्हणतात. तो पाण्यात विरघळत नाही.

एंडोसायटोसीस म्हणजे काय?

एंडोसायटोसीस हा एक महत्वाचा टप्पा आहे ज्यात व्हायरस दुसऱ्या पेशींमध्ये प्रवेश करतो. थोडक्यात, त्या पेशीची भिंत फोडून आत बस्तान मांडतो. या आक्रमणाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. काही व्हायरस कॅप्सिड म्हणजे कवच बाहेर ठेवून आत प्रवेश करतात, तर काही व्हायरस एन्व्हलपसकट आत जातात. काही वेळाने हा एन्व्हलप पेशीच्या मेंब्रेन म्हणजे आतल्या आवरणात एकरुप होतो. प्रवेशप्रक्रिया पार पडली की कॅप्सिडचे काम संपून ते नाहीसे होते आणि विषाणूंची जनुके पेशीत मोकळी होतात.

व्हायरल लेटन्सी म्हणजे काय?

काही व्हायरस पेशींमध्ये प्रवेश मिळवतात. प्रवेश केल्यावर ते पेशी दूषित करतात म्हणजे त्या व्हायरसची डुप्लिकेट कॉपी जन्माला येते आणि त्यानंतर ते व्हायरस झोपी जातात. व्हायरल लेटन्सी ज्या कालावधीत हा व्हायरस जागृत झाल्यास ही व्हायरस पुन्हा पुन्हा तयार होण्याची प्रक्रिया चालू होऊ शकते तो कालावधी. अशा पध्दतीने निद्रिस्त व्हायरस काही काळाने पुन्हा कामाला लागतात. एचआयव्हीचे व्हायरस असेच निद्रिस्त होतात.

झूनोसीस म्हणजे काय?

आता झुनोसीस म्हणजे काय हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. झूनोसीसमध्ये इतर पृष्ठवंशीय प्राण्यांकडून माणसाला व्हायरसची लागण होते. बहुतेक पृष्ठवंशीय प्राण्यांची गुणसूत्रे मिळतीजुळती असतात म्हणून अशी लागण शक्य होते. 

म्हणजे पाहा-
ब्लॅक प्लेग उंदरांकडून माणसाकडे आला.
रेबीज वटवाघूळ, कुत्रे यांच्यामुळे माणसाला होतो.
अँथ्रॅक्स मेंढ्यांच्या माध्यमातून माणासाला होतो.

नव्याने माहिती झालेले व्हायरसेस म्हणजे इबोला, सार्स, एचआयव्ही ही पण झूनोसीसची उदाहरणे आहेत.

अंगलगटीने होणारे व्हायरसचे प्रसारण :

हात हातात घेणे, चुंबन-आलिंगन- इतर लैंगिक जवळीकेने पण विषाणू पसरतात. या इतक्या रोजच्या जीवनातल्या घटना आहेत की त्यामुळे व्हायरस पसरतो हे लक्षातही येत नाही.

ड्रॉपलेट स्प्रेड

शिंकणे, खोकणे, खाकरणे, या क्रिया जेव्हा तोंडावर हात किंवा हातरुमाल न ठेवता केल्या जातात, तेव्हा बाहेर पडणाऱ्या लाळेच्या तुषारांच्या माध्यमातून व्हायरस दूरवर पसरतात.
अमेरिकन संशोधनाप्रमाणे हे संक्रमण २३ ते २७ फूटापर्यंत पण पोहचू शकते.

मंडळी, पुढच्या भागात हवेतून रोगाचा प्रसार, गर्दीतून संक्रमण आणि कोरोना व्हायरसबद्दल सविस्तर माहिती वाचूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required