computer

“क” जीवनसत्व (व्हिटॅमिन C) आपल्या शरीरासाठी का महत्वाचे असते? त्याच्या अभावाचे काय परिणाम होतात?

शरीर हे फक्त कुठल्या एका घटकावर अवलंबून राहणारं नाही. त्याला व्यायामाबरोबरच योग्य अन्नाचीही आवश्यकता असते. त्यातच वेगवेगळी जीवनसत्वे असणाऱ्या भाज्यांचा जेवणात समावेश असेल तर ते नेहमीच शरीरसाठी आरोग्यदायी ठरतं.. आज ह्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात माणसाने आपलं आरोग्य सुरक्षित ठेवून आपली रोगप्रतिकरक शक्ति कायम ठेवणं अन् ती वाढवणं खूप गरजेचं आहे. अशाच एका आरोग्य प्रदान करणाऱ्या जीवनसत्वाबद्दल आपण माहीत करून घेणार आहोत, ते म्हणजे “क” जीवनसत्व. अर्थात Vitamin C.शरीर हे फक्त कुठल्या एका घटकावर अवलंबून राहणारं नाही. त्याला व्यायामाबरोबरच योग्य अन्नाचीही आवश्यकता असते. त्यातच वेगवेगळी जीवनसत्वे असणाऱ्या भाज्यांचा जेवणात समावेश असेल तर ते नेहमीच शरीरसाठी आरोग्यदायी ठरतं.. आज ह्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात माणसाने आपलं आरोग्य सुरक्षित ठेवून आपली रोगप्रतिकरक शक्ति कायम ठेवणं अन् ती वाढवणं खूप गरजेचं आहे. अशाच एका आरोग्य प्रदान करणाऱ्या जीवनसत्वाबद्दल आपण माहीत करून घेणार आहोत, ते म्हणजे “क” जीवनसत्व. अर्थात Vitamin C.

या जीवनसत्त्वाला वैज्ञानिक भाषेत “एस्कॉर्बिक ॲसिड” असंही म्हटलं जातं. फळे आणि भाज्यांच्या सेवनाद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’ मिळतं. संत्रे, आवळा,  स्ट्रॉबेरी, कीवी, ब्रोकोली किंवा पालक यासारख्या फळ आणि भाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन सी'ची मात्रा भरपूर असते.

करोनाला हरवायचं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं खूप आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत. आणि 'क' जीवनसत्व हीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं! 'क' जीवनसत्वामुळे शरीराला अँटी ऑक्सिडेंटस् पुरेशा प्रमाणात मिळतात. त्याच बरोबर ते रक्त वाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतं. शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करून हृदयासंबधित आजारांचा धोका कमी करतं. शरीरातील युरिक ॲसिड कमी करण्याचं कामही हे जीवनसत्व पार पाडतं. रक्तदाब नियंत्रणात आणतं. ह्या जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते. 

एवढंच नाही, तर लोहाचं प्रमाण कमी असल्यास 'क' जीवनसत्वामुळे ती कमरता भरून निघते. कारण अन्नपदार्थातून लोह शोषण्यास ते मदत करतं. गाठी असल्यास त्या कमी करण्यास मदत करतं. जर नुसत्याच वातावरणातील बदलामुळे तुम्ही नेहमी आजारी पडत असल तर ते 'क' जीवनसत्वाची कमतरता असल्याचं लक्षण आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या शरीराची रोगप्रतिकरक शक्ति वाढवायला हवी. त्यामुळे आजच्या महामारीच्या काळात आपण सर्वांना व्हिटॅमिन C असणाऱ्या घटकांचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.

आता नेमकी 'क' जीवनसत्वाची कमतरता आहे की नाही हे कसं जाणून घ्यावं ते आपण माहीत करून घेऊया. जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, किंवा महिन्यातून 2-3 वेळा ताप-सर्दीचा त्रास होत असेल, हिरड्या कमकुवत होत असतील, उच्च रक्तदाब होत असेल, किंवा सारखा थकवा जाणवत असेल, महिन्याभरात अचानक 3-4 किलो वजन कमी होत असेल, जखम लवकर भरत नसेल, केसगळती खूप होत असेल तर अशा वेळी तुम्हाला योग्य प्रमाणात “क” जीवनसत्वाचं सेवन करणं आवश्यक आहे..

पण कुठल्याही गोष्टीचं जास्त सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत घातकही असू शकतं आणि हेच जीवनसत्वांच्या बाबतीही लागू होतं. तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. तसंच व्हिटॅमिन Cच्या बाबतीतही आहे! एका प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिन 'C'चं सेवन तुम्ही नियमित करत असल तर जुलाब, उलटी, छाती जळजळणे, निद्रनाश होणे, पोटदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो! त्यामुळे व्हिटॅमिन C सेवन करण्याचं प्रमाण अंदाजे दररोजचं ६५ ते ९० ग्राम इतकंच असावं. 

व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. शारीरिक कार्यप्रणाली सुरुळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन C खूप फायदेशीर ठरतं त्याचबरोबर शारीरिक जखमा देखील जलदगतीने बऱ्या होतात. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेचा फक्त शरीरावरच नाही, तर मनावरही तितकाच परिणाम होतो! कारण शरीरामध्ये व्हिटॅमिन C ची कमतरता निर्माण झाल्यास तणावाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन C चा समावेश असणाऱ्या आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगी राहते.

त्वचेसाठीही हे जीवनसत्व खूप उपयोगी आणि प्रभावशाली आहे. कॉलेजन हा त्वचेमधला एक अत्यंत महत्वपूर्ण घटक असतो. आणि याच कॉलेजनचं प्रमाण वाढवण्याची कामगिरी व्हिटॅमिन C करतं! याचा फायदा असा होतो की यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणं कमी होण्यास खूप मदत मिळते. त्यामुळे नियमितपणे शरीराला आवश्यक असेल तितकंच व्हिटॅमिन C चं सेवन करा आणि आरोग्यवान रहा!

सबस्क्राईब करा

* indicates required