computer

अर्धशिशि म्हणजे काय ? डोकेदुखी ? जाणून घ्या नेमका काय फरक आहे.

'द डायरी ऑफ ए यंग गर्ल' या पुस्तकाची लेखिका ॲनी फ्रॅंक आठवतेय ? तिने तिच्या पुस्तकात बऱ्याचवेळी  होणाऱ्या त्रासदायक डोकेदुखी विषयी लिहिलं आहे,ज्यामुळे ती फार अस्वस्थ व्हायची. आता डोकेदुखी तज्ञांच मत आहे ती डोकेदुखीची लक्षण अर्धशिशिशी संबंधित आहेत. सांगायची गोष्ट अशी की असे अप्रत्यक्ष संदर्भ अर्धशिशि विषयी बरेच काही सांगून जातात.अर्धशिशि हा बऱ्याच जणांमध्ये आढळणारा सामान्य आजार असला तरी तो काम करण्यासाठी दुबळा किंवा हतबल करणारा आहे.आपल्यापैकीच बरेच जण या आजाराशी सामना करत असतात. साध्या डोकेदुखी पेक्षा अर्धशिशि जास्त गंभीर असा आजार आहे..  

अर्धशिशि यालाच मायग्रेन( Migraine)असेही म्हणतात.
हा एक न्यूरोबायोलॉजिकल (Neurobiological) आजार आहे.ज्यामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना जाणवते.म्हणजेच रुग्णाला डोक्यामध्ये घणाघाती घाव घातल्याप्रमाणे डोके दुखते. यामध्ये आणखीन काही लक्षणे आढळून येतात जसे की,सततची डोकेदुखी होणे, मळमळ होणे, उलटी होणे  तीव्र आवाज सहन न होणे आणि लख्ख प्रकाश इत्यादी पण बऱ्याच वेळा अर्धशिशि रुग्णांचे निदानच होत नाही.. जर तज्ञांची मदत घेतली तर वेळेवर निदान होईल व यशस्वीपणे त्यावर उपचार ही करता येतील.

अर्धशिशिची लक्षणे

अर्धशिशिचा आजार कोणत्या प्रकारचा आहे. त्यानुसार त्या रुग्णाची लक्षणे बदलत असतात.त्यात प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात


१ क्लासिक  मायग्रेन  ( ऑरासह मायग्रेन )(आभासासहित अर्धशिशि) :

या प्रकारातील रुग्णांना पूर्व लक्षणे जाणवतात.यामध्ये डोळ्यांना दिसण्यास त्रास होतो, अस्पष्ट दिसणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे, डोके गरगरल्यासारखं होणे, दृष्टीमधील बदल म्हणजे, अधुंक अधुंक दिसणे, प्रकाश चमकल्यासारखं वाटणे, प्रकाशाचा तरंग डोळ्यासमोरून गेल्या सारखं वाटणे, अगदी काही मिनिटांसाठी दृश्यमान बदल जाणवतात.


२ सामान्य मायग्रेन ( ऑरा शिवाय मायग्रेन ) (आभासाशिवाय अर्धशिशि )

यामध्ये रुग्णाला कोणतेही पूर्व लक्षणे आढळून येत नाहीत.. डोकेदुखी साधारणपणे डोक्याच्या अर्ध्या बाजूस जाणवते.डोळ्याच्या मध्यभागी सुरु होऊन मागे सरकते. 
साधारण डोकेदुखी आणि अर्धशिशि डोकेदुखी यातील फरक POUND ने जाणवतो. 

P म्हणजे Pulsating Pain ( सतत होणारी वेदना )

O म्हणजे One-day duration of servere pain if left untreated ( उपचार घेतले नाहीत तर फारच वेदनादायक ठरेल संपूर्ण एक दिवस )

U म्हणजे Unilateral (one-sided) pain ( डोक्याच्या एका बाजूचा भाग दुखणे )

N म्हणजे Nausea and Vomiting ( मळमळणे आणि उलटी होणे )

D म्हणजे Disabling Intensity ( व्यक्तीची काम करण्याच्या क्षमतेत तीव्र वेदनेमुळे बाधा येणे )

मायग्रेन किती वेळा होतो हे प्रत्येक रुग्णावर वेगवेगळे असते. पण महिन्याला दोन ते चार डोकेदुखी होणे हे सामान्य आहे.४%लोकसंख्यमध्ये महिन्याला किमान १५ दिवस मायग्रेन असतात.. सुमारे मायग्रेनची डोकेदुखी सुमारे चार   तास टिकते, पण गंभीर डोकेदुखी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकते..

अर्धशिशिचे निदान कसे करावे ?

अर्धशिशि चे निदान करण्यासाठी  वास्तविक कोणतेही ठोस चाचणी नाही. तुमचे तज्ञ तुमची मागील  वैद्यकीय इतिहास विचारात घेऊन त्याची लक्षणे व इतर  करणे शोधून काढतात..अर्धशिशि कशामुळे होतो ? 
खरं तर अर्धशिशि हा आजार अनुवंशिक आहे ... उदाहरणार्थ :-. जर एका  मुलाच्या पालकाला अर्धशिशि चा त्रास असेल तर  ती  वारसाहक्काने 50./. होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही पालकांना अर्धशिशि  असल्यास, ७५% होण्याची शक्यता असते. अर्धशिशिच्या पाच पैकी चार रुग्ण हे नातेवाईकच असतात. 

काही कारणीभूत घटक ! जरी अर्धशिशि पूर्व सूचना न देता चालू झाली असेल तरीही काही घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात.

२    प्रमुख घटक   
 - बदलते हवामान ( उष्णता , आद्रता )
    ⁃    झोपेचा अभाव किंवा जास्त झोपणे
    ⁃    थकवा येणे 
    ⁃    महिलांमध्ये हार्मोनल बदल ( उदा :- मुख्यतः पाळीच्या अगोदर किंवा पाळी दरम्यान )
    ⁃    मानसिक आणि भावनिक ताण 

२    आहारातील घटक 

    ⁃    जेवण न मिळाल्याने 
    ⁃    अल्कोहोल 
    ⁃    विशेषतः रेड वाईन 
    ⁃    चॉकलेट 
    ⁃    अचानक गरम हवामान  
    ⁃    चीज सारखे वृद्ध पदार्थ 
    ⁃    चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य 

३    संवेदी  घटक 
    ⁃    प्रखर प्रकाश  किंवा चमकणारा प्रकाश 
    ⁃    मोठा आवाज 
    ⁃    परफ्यूम किंवा पेंट्ससारखे तीव्र वास 

अर्धशिशि कशी टाळावी ?

प्रतिबंधात्मक उपाय :
 - ज्या कारणामुळे अर्धशिशि उदभवण्याचा संभव्य आहे किंवा असतो ते कारणीभूत घटक शक्यतो टाळणे हाच एक उपाय आहे. 
    ⁃    जेवण्याचे, वेळेवर झोपण्याचे अन शारीरिक श्रमाचे योग्य ते नियोजन करणे. 
    ⁃    जर हवामानातले बदल हा घटक कारण असेल तर शक्यतो घरी राहून कामाचे नियोजन करावे.
    ⁃    मंद प्रकाश किंवा अंधारात कमीत कमी ८ तास चांगली झोप घ्यावी. 
    ⁃    झोपताना शक्यतो सर्व प्रकारचे उपकरणे टाळावीत ( उदा:- मोबाईल )
    ⁃    मानसिक ताणतणाव टाळावा. 

हा आजार बरा होऊ शकतो का ?

हो.तीव्र अर्धशिशि आणि त्याचे भविष्यात होणारे त्रास कमी करण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. 
पण तुम्ही स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनू नका. तुमच्या बाबतीत औषधे सवोत्तम असतील हे घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

-अभिषेक मिनाक्षी कोकरे ..

सबस्क्राईब करा

* indicates required