इंग्रजीत सर्रास वापरले जाणारे १० भारतीय शब्द!! तुम्हांला आणखी कोणते शब्द ठाऊक आहेत?

कुठल्याही भाषेला समृद्ध करण्यात इतर भाषांचा मोठा वाटा असतो. आज आपण कुठलीही भाषा बोलत असू तरी कळत नकळत आपण बोलत असलेल्या भाषेतील असंख्य शब्द हे इतर भाषांतून उसने घेतलेले असतात. भाषेची हीच खासियत म्हणता येईल. म्हणून आपल्या भाषेवर प्रेम करताना इतर भाषांवरही प्रेम करावे. आज इंग्लिश जर जगाची भाषा असली तरी भारतातील शासनकाळात भारतीय भाषांमधील अनेक शब्द उचलून आज त्यांच्या भाषेतील शब्द तयार झाले आहेत. तसेच इतरही भाषांमधील शब्द घेऊन इंग्लिश शब्द तयार झाले आहेत. असेच काही इंग्लिशमधील शब्दांचे मूळ आज आपण जाणून घेणार आहोत.

) सॅलरी

जुन्या रोममध्ये पैसे नव्हे, तर मीठ हे देवाणघेवाणीचे साधन असे. लोकांना पगार म्हणून मीठ दिले जात असे. मीठासाठी लॅटिन शब्द आहे साल (sal). म्हणून मग पगाराला सॅलारियम असे म्हटले जात असे. पुढे हा शब्द इंग्लिशमध्ये सॅलरी असा अपभ्रंशित होत रूढ झाला. आता आपण जेव्हा मेरा नमक खाया है म्हणू तेव्हा ते टेक्निकलीही बरोबर असेल.

२) व्हरांडा

इंग्लंडमध्ये चांगलेच थंड वातावरण असल्याने तिथे घरांना काही ओटा नसे. पण ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना घरोघरी व्हरांडा दिसू लागला. त्यांना हे काय असते हेच माहिती नसल्याने तेही याला व्हरांडाच म्हणू लागले. फक्त व्हरांडाऐवजी जशी जीभ वळेल तसे वरांदाह म्हणू लागले. आता इंग्लिशमध्ये व्हरांडासाठी वरांदाह हा शब्द रुळला आहे. यातही विशेष गोष्ट म्हणजे व्हरांडा हा शब्दच मुळात पोर्तुगीज भाषेतून हिंदीत आला होता.

) जंगल

जंगल या शब्दाला अनेक पर्यायी शब्द असले तरी जंगल हाच शब्द अनेक भाषेत रूढ आहे. इंग्लिशमध्ये जंगलबुक सिनेमा आलेला तेव्हा काही लोकांना इंग्लिशमध्येही जंगल म्हणतात का असा प्रश्न पडला होता. इंग्लिश लोक भारतात आले तेव्हा त्यांच्या लेखी 'वाईल्ड' असलेल्या गोष्टीसाठी ते ही जंगली-जंगल असे शब्द वापरू लागले. आता जंगल शब्द हिंदीतून घेतला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

) जगरनॉट

जगरनॉट शब्दाचा अर्थ आहे ज्याला रोखता येणे कठीण आहे असा. जगरनॉट शब्द ठिकठिकाणी तुम्ही वाचला असणार आहे. याचे मूळ मात्र आपल्या पुरीच्या भगवान जगन्नाथ यांच्या नावावरून आहे. भगवान जगन्नाथाचा रथ हा प्रचंड आणि ओढण्यास कठीण असतो. इथू जगरनॉट शब्दाचा उगम झाला. इंग्लिशमध्ये एवाढव्य ट्रकला देखील जगरनॉट म्हटले जाते.

) ठग

हा शब्द देखील असा आहे जो इंग्लिशमध्ये सर्रास वापरला जातो. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात लुटालुटीच्या घटना घडल्या. तेव्हा भारतीयांचे बोलणे ऐकून इंग्लिश लोक देखील याला ठगी आणि चोरांना ठग म्हणून लागले. अशा पद्धतीने हा शब्द देखील इंग्लिशमध्ये रुळला आहे.

) मुंगूस

मुंगूस (mongoose) इंग्लिशमध्ये मुंगूससाठी मराठीतुन उधार घेतलेला मुंगूस हाच शब्द वापरला जात असतो. हा शब्द देखील १९ व्या शतकापासून इंग्लिशमध्ये रूढ झाला आहे.

) डुलाली

डुलाली (doolally ) हा शब्द इंग्लिशमध्ये बोअर होणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. याची पार्श्वभूमी चांगलीच रंजक आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यात देवळाली येथे आर्मी कॅम्प आहे. हा कॅम्प ब्रिटिश काळापासून तिथे आहे. तर त्या ठिकाणी ज्या सैनिकांना पाठवण्यात येत असे ते एकटे राहून बोअर होत. म्हणून देवळालीवरून डुलाली हा शब्द रूढ झाला.

) चिट

आपण परीक्षा द्यायला जाताना एक छोटा कागद घेऊन जायचो, ज्यावर कॉपी केलेली असायची. यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे चिट. चिट्ठीवरून चिट हा शब्द वापरला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इंग्लिशमध्ये चिट हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो त्याचे मूळ देखील भारतातच आहे.

) लूट

भारतात हिंदी, मराठी अशा काही भाषांमध्ये लूट हा शब्द चोरी, किंवा काही गोष्टी बळजबरी हिसकावून घेणे यासाठी वापरला जातो. भारतात १८ व्या शतकात इंग्रजांनी जम बसवला होता. त्याकाळी अशा घटना मोठ्या प्रमाणावर होत असत. तेव्हापासून इंग्रजांच्या तोंडी देखील लूट हा शब्द रूढ झाला.

१०) बंगलो

आपल्या बंगला शब्दाला इंग्रजांनी बंगलो केले इतकाच काय तो फरक. बाकी हा ही शब्द मूळ आपलाच आहे. सुरुवातीला १७ व्या शतकात बंगालमध्ये एक खोली असलेल्या घरांना जे ब्रिटिश लोकांसाठी बनवलेले असत त्यांना बंगला म्हटले जात असे. नंतर हा शब्द मोठ्या घरांसाठी रूढ झाला.

सबस्क्राईब करा

* indicates required