computer

हा १० सेकंदाचा व्हिडीओ ४८.३ कोटी रुपयांना कसा विकला गेला? काय आहे या व्हिडीओ मध्ये?

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील गोष्टी जसे की माहिती/व्हिडीओ, यांची विक्री करून पैसे कमावता येतात हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण, यातून तुम्ही कितपत पैसे कमवू शकता असं तुम्हाला वाटतं? हजार, दहा हजार किंवा लाख रुपये? मायामीतील एका संग्रहाकाने फक्त दहा सेकंदाच्या व्हिडीओतून मिळवलेल्या पैशाची रक्कम बघाल तर तुम्ही थक्क व्हाल. दहा सेकंदाचा हा व्हिडीओ विकून त्याने ६६ लाख डॉलर्सची कमाई केली आहे.

पाब्लो रॉड्रिग्झ-फ्रेल याने ऑक्टोबर २०२० मध्ये हा व्हिडीओ ६७,००० डॉलर्स (४९ लाख रुपये) ला विकत घेतला होता. खरे तर फक्त दहा सेकंदाचा हा व्हिडीओ तो इंटरनेटवर अगदी फुकटातही पाहू शकला असता. पण तरीही या व्हिडीओसाठी त्याने इतकी रक्कम का मोजली?

कारण, त्याला माहित होते की पुढे अशा ऑनलाईन मालमत्तेतून त्याला भरपूर कमाई करता येईल. गेल्या काही महिन्यात तर एनएफटी म्हणजे नॉन-फंजीबल गोष्टींची विक्री भरमसाठ वाढली आहे. बिटकॉइन सारख्या क्रीप्टोकरन्सीच्या विक्रीत वाढ झाल्याने एनएफटीमध्ये पैसे गुंतवण्याला गुंतवणूकदार जास्त प्राधान्य देत आहेत. इजएफटी ही एक नवी डिजिटल असेट म्हणजे डिजिटल मालमत्ता म्हणून गणली जाते. ज्यामध्ये फक्त ऑनलाईन गोष्टीं गृहीत धरल्या जातात. कोव्हीड-१९च्या काळात या प्रकारच्या मालमत्तेमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक उत्साही गुंतवणूकदार अशा डिजिटल मालमत्तेत पैसा गुंतवण्यास उत्सुक आहेत.

नॉन-फंजीबल वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्यांची एकमेकांच्या बदल्यात त्याच वस्तूची देवाणघेवाण होऊ शकत नाही. फंजीबल वस्तूंची अशा पद्धतीने देवाणघेवाण केली जाते. उदा सोने. सोन्याच्या बदल्यात सोने दिले किंवा घेतले जाते. पैसा, पैशाच्या बदल्यात पैसे देता-घेता येतात. तर अशा गोष्टी या फंजीबल असेटमध्ये मोडतात. पण, घर, जमीन, अशा गोष्टींची देवाण घेवाण अशा पद्धतीने होत नाही घराच्या बदल्यात घर जमिनीच्या बदल्यात कोणी जमीन देत नाही, त्याचे मूल्य पैशात केले जाते आणि मगच त्याची खरेदी विक्री होते.

आता या दहा मिनिटाच्या व्हिडीओची देवाणघेवाण व्हिडीओच्या बदल्यात व्हिडीओ अशी करता येत नाही. तुमची डिजिटल मालमत्ता प्रमाणित करण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला मदत करते. या टेक्नोलॉजीकडून तुमच्या डिजिटल मालमत्तेवर डिजिटल सिग्नेचर मिळते. ही डिजिटल सिग्नेचर याचे प्रमाण असते की तुमचा कंटेंट म्हणजेच व्हिडीओ किंवा माहिती ओरिजिनल आहे आणि त्याचा विनापरवानगी पुनारावापर करणे शक्य नाही. त्याचा पुनरवापर करण्यासाठी तुम्हाला ती वस्तू विकतच घ्यावी लागेल.

तुम्ही स्वतः एखादी वैशिष्ट्यपूर्ण कल्पना निर्माण करता तेंव्हा त्याला एक निर्मितीमूल्य निश्चितच असते. अशा कंटेंट बाबत ब्लॉकचेन टेक्नोलॉजी एकमेव कलाकृती म्हणून तो कंटेंट सार्वजनिक करण्यासाठी प्रमाणित करते. यामुळे अशा मूळ कल्पनेला जास्त किंमत आहे.

काही वर्षांपूर्वी नियान मांजरीचे एक GIF असेच व्हायरल झाले होते. त्याला दहावर्षे पूर्ण झाल्याने त्या GIF च्या निर्मात्याने पुन्हा त्यात काही फेरबदल केले त्याची पुनर्रचना केली आणि एक नवे GIF व्हायरल गेले. तुम्हाला कल्पना नसेल पण या नव्या गिफलाही तब्बल $ ५,६०,००० मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?

४८.३ कोटी रुपयाला (६६ लाख डॉलर) विकलेल्या गेलेल्या त्या दहा सेकंदाच्या व्हिडीओमध्ये नेमके आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर, या व्हिडीओ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना महाकाय राक्षसाचा आकार देण्यात आला आहे. त्यांच्यावर जे काही आरोप लावण्यात आले, ते प्रत्येक आरोप या राक्षसी ट्रम्पच्या शरीरावर टॅटूप्रमाणे गोंदवण्यात आले आहेत. आणि हा आरोपांचे टॅटू गोंदवलेला राक्षस रस्त्याच्या एका कडेला निपचित पडला आहे. सामान्य अमेरिकन नागरिक त्याच्या समोरच असलेल्या फुटपाथवरून बिनधास्त ये जा करत आहेत. असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

आता याचा अर्थ काय हे समजण्या इतके सुज्ञ तुम्ही नक्कीच आहात. तर बघा तुम्हालाही अशी एखादी आयडियाची कल्पना सुचते का. प्रयत्न करायला हरकत काय आहे?आयडियाची कल्पना सुचते का. प्रयत्न करायला हरकत काय आहे? 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required