computer

या ११ ठिकाणी मिळतो मुंबईतील बेस्ट वडापाव !!

पुणेकरांकडे जर मिसळ असेल तर आमच्याकडे आमचा हक्काचा वडापाव आहे असं छातीठोकपणे मुंबईकर म्हणतो.  कारण वडापाव म्हणजे प्रत्येक मुंबईकाराचा जीव की प्राण आहे. मंडळी, आम्ही तुम्हाला वडापावचा शोध कसा लागला याबद्दल '...असा झाला वडापावचा जन्म !!' या लेखात माहिती दिली होती. आपला या लाडक्या वडापावचा जन्म दादर मध्ये झाला असला तरी संपूर्ण मुंबईने त्याला उचलून धरलं आहे. मंडळी, नुकतंच आपल्या 'वडापावच्या नावाने 'पोस्टल स्टॅम्प' जारी करण्यात आले आहेत. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

स्रोत

तर मंडळी, आज आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईतली वडापावसाठी फेमस असलेली दहा ठिकाणं !!

चला तर वाट कसली बघताय...या लिस्टकडे एकदा नजर टाकूया !!

१. अशोक वडापाव

प्रभादेवीमधल्या कीर्ती कॉलेज जवळचं अशोक वडापाव हे गेल्या ३५ वर्षापासून वडापाव विकत आहेत. इथे तर बॉलीवूड सेलिब्रिटीसुद्धा वडापाव खाऊन गेलेत राव. इथली खासियत म्हणजे हे लोक एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरत नाहीत.

२. ग्रॅजुएट वडापाव

यांचं नाव ग्रॅजुएट वडापाव का? याचं उत्तर माहित नाही.  पण इथला वडापाव अव्वल दर्जाचा आहे. गेल्या १७ वर्षापासून हे लोक वडापाव विकत आहेत. भायखळा स्थानकाच्या पूर्वेला हे दुकान आहे.  

३. आनंद वडापाव

विलेपार्ले स्टेशनच्या पश्चिमेला मिठीबाई कॉलेजच्या अगदी समोर आनंद वडापाव दिसेल.

४. सम्राट वडापाव

वडापाव सम्राट म्हणून पार्लेश्वर भागात ‘सम्राट वडापाव’ फेमस आहे. तिथल्या मिक्स भजींबरोबर दिलेला वडापाव खूप प्रसिद्ध आहे. विलेपार्ले स्टेशनच्या पूर्वेला उतरल्यावर तुम्हाला सम्राट वडापाव दिसेल.

५. शिवाजी वडापाव

विलेपार्लेच्या मिठीबाई कॉलेजच्या जवळच शिवाजी वडापावसुद्धा आहे. इथल्या वडापाव बरोबरच सँडवीचसुद्धा प्रसिद्ध आहे.

६. कुंजविहार वडापाव

ठाणे स्टेशनच्या पश्चिमेला कुंजविहार वडापाव म्हणून मोठी पाटी आपल्याला दिसेल. इथल्या वडापावसाठीच कुंजविहार प्रसिद्ध आहे. वडापावशिवाय खाद्यपदार्थांच्या अनेक व्हरायटी आपल्याला इथे खायला मिळतील.

७. बोरकर वडापाव

गिरगावच्या बोरकर वडापावची ख्याती सगळीकडे पसरली आहे. गिरगाव चौपाटीवर बोरकर वडापावची ब्रांच आहे. इथली चटणी खवय्यांना फार आवडते म्हणे.. गिरगावमधल्या पै हॉस्पिटलजवळ बोरकर वडापाव सेंटर आहे.

८. चंगू-मंगू वडापाव

नाव पण कसलं भारी आहे राव!! दहिसर मधलं हे एक फेमस वडापाव पॉईंट आहे. वडापावबरोबर मिसळसुद्धा इथे मस्त मिळते.

९. लक्ष्मण वडापाव

घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव अनेक वर्षापासून वडापाव खाऊ घालत आहे. इथली फेमस टेस्ट मुबईमध्ये फेमस आहे. लक्ष्मण वडापाव त्यांच्या जैन वडापावसाठी प्रसिद्ध आहे.

१०. भाऊ वडापाव

भांडूपमधलं फेमस वडापाव सेंटर म्हणजे कोणतं तर,  ‘भाऊ वडापाव’. भांडूप मधल्या वाल्मिकी नगर भागात हे दुकान आहे.

११. गजानन वडापाव

ठाण्यात कुठेही जाऊन तुम्ही गजानन वडापावचा पत्ता विचारू शकता. इथल्या वडापावपेक्षा त्याची चटणी जास्त हिट आहे बॉस. मस्त चटणी आणि वडापाव खाऊन ‘दिल खुश हो जायेगा..’ ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस हे दुकान आहे.

मंडळी आता लवकरात लवकर या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन बनवा आणि जर या ठिकाणांना तुम्ही भेट दिली तर वडापाव बरोबर एक सेल्फी पाठवायला विसरू नका...चालतंय का ??

 

 

आणखी वाचा :

...असा झाला वडापावचा जन्म !!

लंडनमध्ये वडापाव विकून हे दोघे झाले कोट्याधीश !!

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा