लंडनमध्ये वडापाव विकून हे दोघे झाले कोट्याधीश !!

मंदीच्या काळात जशा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तशीच वेळ संजय सोहनी या माणसावर देखील आली. एक दिवस त्याला कळवण्यात आलं की त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. मंदीच्या काळात तेव्हा लंडनमध्ये राहायला असलेल्या या माणसाकडे ‘वडापाव’ खायला देखील पैसे नव्हते. पण याच वडापावच्या जोरावर तो कुठच्या कुठे जाणार होता हे त्यालाही माहित नव्हतं बंधू !! 

ठाण्यात जन्मलेला संजय हा लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅनेजर पदावर होता. मंदीच्या लाटेत नोकरी गमावल्यानंतर त्याने ‘सुबोध जोशी’ या त्याच्या मित्राचं घर गाठलं. तो बोलण्याच्या ओघात म्हणून गेला की ‘माझ्याकडे वडापाव खायला देखील पैसे नाहीत.’ या सहज निघालेल्या वाक्यातली वडापाव हीच त्यांची आयडिया बनली आणि त्यांनी चक्क लंडनमध्ये वडापाव विकायला सुरुवात केला. 

स्रोत

डोक्यातील आयडिया प्रत्यक्षात उतरवताना त्यांना पहिली अडचण आली ती म्हणजे जागेची. शोधाशोध केल्यानंतर त्यांना एका ‘पोलीश आईस्क्रीम कॅफे’ मध्ये एक जागा मिळाली. हा कॅफे तोट्यात असल्याकारणाने कॅफे मालकाने त्यांना ४०० (रु. ३५००० ) पाउंड प्रती महिना दराने जागा भाड्याने दिली.

वडापाव १ पाउंड (रु. ८०) आणि दाबेली १.५० पाउंड (रु. १३१) या किमतीने त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.  पण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात करावी लागणारच हे त्यांना कळून चुकले. मग काय राव, दोघांनी लंडनच्या रस्त्यावर मोफत वडापाव वाटण्यास सुरुवात केली. ‘इंडियन बर्गर, स्वस्त आणि मस्त’ म्हणत हा देसी वडापाव लंडनवासीयांनी शेवटी स्वीकारलाच. दोघांचा मार्केटिंग फंडा कामी आला, पण आता गरज होती मोठ्या जागेची.

स्रोत

त्याच वेळी एका पंजाबी हॉटेलने त्यांना सोबत व्यवसाय करण्याची ऑफर दिली. दोघांनी त्याला लगेच होकार कळवला आणि अशा प्रकारे एका लहानशा स्टॉलवर सुरु झालेल्या धंद्याचं रुपांतर ४.४० कोटी वार्षिक उत्पन्न असलेला व्यवसायात झालं.

स्रोत

सध्या ‘श्रीकृष्ण वडापाव रेस्टॉरंट’ नावाने संजय आणि सुबोध आपल्या ३५ जणांच्या टीमबरोबर काम करत आहेत. वडापाव आणि दाबेली शिवाय भारतातील ६० वेगवेगळ्या डिश त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात.

स्रोत

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं की ‘जो होता हें, अच्छे के लिये होता हें |’

सबस्क्राईब करा

* indicates required