दुबई कालची आणि आजची : दुबईचं बदललेलं रूप बघून धक्का बसेल राव!!

भारतात अनेक असे तरुण आहेत ज्यांना रोजगारासाठी अरब देशात जाण्याची इच्छा आहे. दुबई हे अशाच लोकांचं ठिकाण. फक्त भारतातूनच नव्हे तर नेपाळ, पाकिस्तान. बांगलादेश, इजिप्तच्या भागातून तरुण दुबईकडे खेचले जातात.  बुर्ज खलिफाचं बांधकाम कसं झालं याचा व्हिडीओ जर तुम्ही बघितलात तर त्यात ओळखीची चेहरेपट्टी असेलेले अनेक दिसतील.

डोंगरी ते दुबई पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे दुबईत अर्ध्याहून अधिक जनता ही अनेक देशातून स्थलांतरित झालेली आहे. त्यात कामगारांपासून, तस्करी करणारे, गुन्हेगार, व्यापारी, पर्यटक, असे सगळेच आले. जो पैसा जगात काळा पैसा म्हणून समजला जायचा तो इथे  आपोआप गोरा व्हायचा. दुबईची भरभराट अशीच झाली.

पण मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आताचं लोकप्रिय आणि स्वप्नवत असलेलं दुबई शहर एकेकाळी निव्वळ एक वाळवंट होतं ते? दुबईचं आताचं रूप बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत दुबईचे पालटलेलं रूप दाखवणारे काही जुने आणि नवे फोटो.

(खालील फोटोवर क्लिक करा)

सर्व फोटो स्रोत