हे १२ त्रास फक्त चश्मिष माणसंच समजू शकतात!!!

तुम्हाला चष्मा लागलाय ? मग तुम्हालाच हे दुःख समजू शकतं राव!!!
‘अरे तुला चष्मा लागलाय ?’....’एकदा ट्राय करुदे ना तुझा चष्मा’....’किती भयानक नंबर आहे रे तुझा’.....’हे किती दिसतंय....दोन कि तीन ?’....’ये बॅट्री’
हे असले पांचट डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकले असतील. साले हलकट मित्र चश्मिष-चश्मिष म्हणून चिडवतात ते वेगळंच. काय तर म्हणे कर्ण जसा जन्मजात कवच कुंडल घेऊन जन्मलेला तसाच तूही हा चष्मा घालूनच पैदा झाला होता. असो...
आम्ही आज तुमच्यासाठी अश्या काही गोष्टी घेऊन आलो आहेत ज्या फक्त आणि फक्त चश्मिष व्यक्तीच समजू शकतात !
(चश्मिष नसाल तरी समजून घ्या बिचाऱ्यांच दुःख)
१. गरम पदार्थ खाणे/पिणे !
चहा, कॉफी, सूप असे गरमागरम वाफाळते पदार्थ चष्मा घालून पिणे म्हणजे स्पा मध्ये बसण्याचा फील घेण्यासारखं आहे. डोळ्यांसमोर आपोआप वाफेचे धुके येतात आणि साला चष्मा काढून पिऊ म्हटलं तर समोरचं काही दिसत नाही.
२. मोठ्या नंबरचा चष्मा !
मोठ्या नंबरचा चष्मा असेल तर पंचायत ठरलेली. समजा चष्मा चुकून खाली पडला की जवळ जवळ आपण आंधळेच. शेवटी काय तर आपला ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ होणार !!!
३. नवीन बारसं !!!
आपल्या आईवडिलांनी काहीही नाव ठेवलेलं असूदे. पण चश्मा लागला की आपलं नवीन बारसं ठरलेलं. चश्मिष, सिंगल बॅट्री डबल पॉवर, चार डोळ्यांचा, आंधळ्या, वगैरे वगैरे !!!
४. पावसाळ्यात लागणारे घोडे !
सर्वात जास्त वाट लागते ती पावसाळ्यात ! चष्मा लागलेल्या माणसाला जरूर वाटत असतं की चष्म्याला पण कार सारखे ‘वायपर’ असते तर ? ‘खयाली पुलाव’ अजून काय !!!
५. गर्दीतल्या धक्काबुक्कीत चष्मा सांभाळणे !
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना माहित असेल कि धक्काबुक्कीत चष्म्याला सांभाळण म्हणजे कोणत्याही स्टंट पेक्षा कमी नाही! त्यात जर चष्म्याच्या काचेला कुणाचा हात लागला की झालेच कल्याण!!! रेल्वेतून प्रवास करणारा प्रत्येक चश्मिष हा बाहुबलीच असतो!
६. ‘हे किती आहेत ?....दोन की तीन ?’
हे चू***या मित्र आपल्या समोर बोटं नाचवून विचारणार कि हे किती आणि ते किती. असलं डोकं फिरतं म्हणून सांगू? ‘च्यायला चष्मा लागलाय, आंधळा नाही झालोय’ !!!
७. पापण्यांमुळे चष्मा सारखा सारखा नीट करावा लागणं !
हे मुलींच्या बाबतीत जास्त होतं. डोळे उघडझाप करताना पापण्यांचे केस काचेला टेकतात मग पुन्हा चष्मा नीट करा, परत हळू हळू चष्मा मागे येणार मग पुन्हा चष्मा नीट करा. हे म्हणजे फारचं अवघड गड्या !!!
८. चष्मा घालून कसंही लोळू शकत नाही !
हे अगदी १०१% ठरलेलं. समजा आपण सोफ्यावर बसून टीव्ही पाहतोय आणि आळस येऊन आपण हळू हळू तिथेच झोपी गेलो पण आपल्याला टीव्ही देखील पहायचा आहे म्हणून आपण कूस बदलली कि लगेच चष्म्याची फ्रेम हललीच म्हणून समजा. त्यात कळस म्हणजे चष्माच तुटण्याची भीती आणि चष्मा काढला कि सगळं ‘ब्लॅक ब्लॅक’ सारखी परिस्थिती. मग काय घंटा टीव्ही बघणार !!!
९. 3D सिनेमा बघताना हालत खराब !!!
3D सिनेमा बघण्यासाठी जो स्पेशल चष्मा दिला जातो त्यावेळी तर मोठीच पंचायत होते. आपल्या जन्मजात चष्म्याच्यावर तो 3D चष्मा चढवायचा आणि अश्या परिस्थितीत समोर काय अगम्य चाललं आहे याच्याकडे लक्ष द्यायचं. व्हा !!!
१०. ‘ए...तुला खरंच चष्मा लागलाय ?’
असं विचारल्यावर आपण काय उत्तर देणार ? खोटा चष्मा कसा लागतो ब्वा ? आम्हाला पण सांगा !!!
११. ‘ए तुझा चष्मा मी ट्राय करू का ?...दाखव ना !’
स्रोत
चष्मा म्हणजे काय खेळण्याची वस्तू वाटली का यांना ? आणि समजा आपण चष्मा दिलाच तर हेच तोंड वर करून म्हणणार ‘किती जाड भिंगाचा चष्मा आहे...मी आंधळा होईन...घे तुझा चष्मा !’ मग आधी का मागितलंस भेंडी !!!
१२. शेवटी चश्मिष लोकांचं जीवन म्हणजे काय आहे ओ ???
पैदा झाले
चष्मा नीट करा!
मेले!
एवढं सोप्पं जीवन आणखी कोणाचं असेल का?
काहीही म्हणा पण एक 'अंदर की बात सांगतो'....चश्मिष मुली जाम क्युट दिसतात राव म्हणून चष्मा घालाच (हे फक्त मुलींसाठी हां) !!!
बाकी तमाम चश्मिष लोकांच्या दुःखात आम्ही सामील आहोत !!!