अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातल्या १४ भोंदू बाबांची लिष्ट जाहीर केली.. यातले कोण कोण तुम्हांला माहित आहेत?

आद्य श्री श्री श्री आसाराम बापू तात्या, राम रहीम भौ, राधे माँ ताई अश्या दिग्गजांच्या मोठमोठ्या लीला पाहता अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची लिष्ट जाहीर केली आहे. मंडळी खरं तर अशा महापुरुषांना भोंदू म्हणू नये, पण यापेक्षा चांगला शब्द आम्हाला तरी सापडला नाही. असो... 


तर, राव धर्माच्या नावाने आणि देवाच्या नावाने लोकांना उल्लू बनवणाऱ्या या  १४ बाबांवर बहिष्कार घालण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेत करण्यात आली आहे.  अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अलाहाबादमधल्या बैठकीत ही लिस्ट जाहीर करण्यात आली. या लिस्टमध्ये वर दिलेले सर्व महात्मे तर आहेतच,  त्याशिवाय आणखीही नावे आहेत. पण भौ, काही छुपे रुस्तम देखील असतील ज्यांनी अजून आपलं अवतार कार्य सुरु केलेलं नाही.  तेही प्रकाशात येतीलच.  

पण तूर्तास हे  १४ लोक कोण कोण आहेत ते पाहू. 

१. आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी

२. सुखविंदर कौर उर्फ राधे मां

३. गुरमीत राम रहीम सिंह इंसान(!)

४. नारायण साई
५. सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
६. ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
७. स्वामी असीमानंद
८. ओम नमः शिवाय बाबा
९. निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
१०. इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी
११. रामपाल

१२. आचार्य कुशमुनी

१३. बृहस्पती गिरी

१४. मलखान सिंह

 

या यादीत अजून कुणाला सामील करायचं आता तुम्हीच सांगा बरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required