computer

गणेशोत्सव स्पेशल : गणपती बाप्पासाठी बनवा हे १५ प्रकारचे झटपट मोदक !!

मंडळी बाप्पाच्या आगमनाला ५ दिवस पूर्ण झाले. दिवस खरच खूप लवकर जातायत. पण त्याचा आपण का विचार करायचा. आपण विचार करूया उरलेल्या पाच दिवसात काय करायचं ते. आम्ही तुम्हाला एक आयडिया देऊ का. बाप्पाच्या आवडीचा मोदक का नाही करत ? आता तुम्ही म्हणाल गणेशोत्सवात मोदक कर हे वेगळं सांगायची गरज आहे का ? तर आम्ही एक वेगळी आयडिया द्यायला आलोय. आम्ही आज तुम्हाला १५ वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे करायचे याची कृती सांगणार आहोत. आहे ना धम्माल आयडिया ?

चला तर बाप्पाच्या आवडीच्या पदार्थाचे १५ प्रकार पाहूयात.

१. चॉकलेटचे मोदक

सर्वात आधी खवा, खोबरं बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्या. त्यानंतर एकेका मोदकाला चॉकलेट सॉसमध्ये बुडवून घ्या. मोदकांना मस्त चॉकलेटचा कोट चढला की चॉकलेटचे मोदक तयार.

२. पुरणाचे मोदक

पुरण पोळ्या करण्यासाठी जो सारण वापरला जातो तोच पुरणाचे मोदक करताना वापरा. पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून तळले की मोदक तयार.

३. खोबरं मैद्याचे मोदक

हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खवा, साखर, खोबरं एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

४. खव्याचे मोदक

खव्याचे मोदक करण्यासाठी खव्यात साखर, केशर घालून एकत्र करा. त्यांनतर त्यांना भाजून घ्या मोदकांचा आकार द्या.

५. फ्रुट मोदक

हे अगदी सोप्प आहे मंडळी, वेगवेगळया प्रकारची फळे घ्या व त्यांना मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून सारण तयार करा. हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून तळले की मोदक तयार.

६. तांदळाचे गुलकंदी मोदक

तांदळाचे गुलकंदी मोदक करण्यासाठी तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.

७. बटाटयांचे मोदक

बटाट्याचे मोदक करण्यासाठी सर्वात आधी बटाट्यामध्ये काजू, बेदाणे, खवा, साखर, घालून त्याचा हलवा बनवा. याच हलव्याचे मोदक करावेत. यासाठी मोदकाचे साचे वापरले तर सुरेख मोदक तयार होतील. मोदक तयार झाले की वरून दुधाची पावडर लावावी.

८. मैद्याचे उकडीचे मोदक

मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा.

९. तीळगुळाचे मोदक

हा मोदक प्रकार यवतमाळ भागात करतात. गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे.

१०. काजूचे मोदक

काजू कतलीचे सारण घेऊन त्यात खवा, खडीसाखर भर व मोदकाचा आकार द्या.

११. गूळ कोहळ्याचे मोदक

हा प्रकार प्रामुख्याने विदर्भात आढळतो. कोहळ्या पासून मोदक करण्यासाठी गूळ, लाल कोहळा व कणिक एकत्र करून मळून त्याला मोदकांचा आकार दिला जातो. हे मोदक मंद आचेवर तळले की गूळ कोहळ्याचे मोदक तयार.

१२. डिंकाचे मोदक

डिंकाचे मोदक करण्यासाठी डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून तळून घ्या.

१३. पोह्यांचे मोदक

यासाठी पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळून घ्या. मळलेल्या गोळ्याच्या पारी कराव्या. या पोह्याच्या पारी मध्ये तुम्हाला हवे ते सारण भरून मोदक तयार करता येतात.

१४. बेसनाचे मोदक

बेसनाचे मोदक करताना बेसनाच्या लाडवाच्या सारणाला मोदकाचा आकार आकार द्या व मधे एक एक काजू भरा.

१५. शेंगदाण्यांचे मोदक

शेंगदाण्याच्या पोळ्या करताना वापरतात तसंच सारण शेंगदाण्यांचे मोदक करताना वापरला जातो. गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात बेदाणे, काजू, घालावे. हे सारण उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्या.

 

 

आहेत की नाही सोप्प्या पद्धती ? चला तर आज पासून एक नवीन प्रयोग करून बघा. आणि हो यातला तुम्हाला आवडलेला मोदक प्रकार कोणता हे सांगायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required