computer

पोरींनो, 'व्हॅलेंटाइन्स डे'ला आपल्या नवऱ्याला/बॉयफ्रेंडला द्या या १५ भन्नाट गिफ्ट्स !!!

व्हॅलेंटाइन्स डे, त्याचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा काही खास दिवसांना नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला काही भेट द्यावी असं बऱ्याचजणींना वाटत असतं. पण होतं काय, पुरुषांना गिफ्ट द्यायला इतके कमी पर्याय असतात, की ते पहिल्या काही दिवसांतच संपतात!! म्हणून खास आमच्या महिला वाचकांना मदत म्हणून आम्ही पुरुषांना भेट द्यायच्या पर्यायांची यादी घेऊन आलो आहोत.  

आधी घेऊयात आपले नेहमीचे यशस्वी कलाकार..

१. वॉलेट

पैशांचं पाकिट भेट न मिळालेला पुरुष दाखवा आणि पाकीट भेट मिळवा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कुणालाही भेट देताना रंग, आकार, मटेरिअल कशाकश्शाचा विचार न करता लोक वर्षानुवर्षे हे गिफ्ट पुरुषांना देत आले आहेत. अडचण एकच आहे की पुरुषमंडळी एकच पाकिट ते खराब होत नाही, तोपर्यंत ते बदलत नाहीत. म्हणजे बायकांना  एका वर्षात दहा वेगवेगळ्या पर्सेस दिल्या तरी त्यांना काही अडचण नसते, पण इथे मात्र एकदा पाकिट दिलंत, तर किमान वर्षभर तरी तो पर्याय विसराच.

२. बेल्ट

हे पुरुषांना देण्याचं नेहमीचं दुसरं गिफ्ट. यात सध्या बेल्टपासून ब्रँडेड बेल्टपर्यंत बरेच पर्याय मिळतील. फॉर्मल बक्कल, थोडे फॅन्सी बक्कल वगैरेही पाहायला हरकत नाही. मात्र कंबरेचं माप ध्यानात असू द्या, नाहीतर नुसतीच कपाटाची धन होऊन बसायची.

३. ऑफिस बॅग

यामध्ये मात्र बरेच पर्याय असतात. म्हणजे लेदरची खांद्याला अडकण्याची आणि बरेच कप्पे असलेली बॅग. 

अँटीथेफ्ट म्हणून झिप लपवलेली बॅग.

किंवा आपली नेहमीची बॅकपॅक.

४.घड्याळ

घड्याळं मात्र माणसाकडे एकाहून अधिक असू शकतात. एखादं सोनेरी, एखादं स्टील फिनिशिंगचं हे तर नेहमीचं झालं. गन मेटल फिनिशही एकेकाळी चलतीत होतं. आता तर स्मार्टवॉचचाही पर्याय आहे. आपापलं बजेट पाहा आणि एखादं घेऊन टाका

५. शर्ट

आपल्या खास माणसाला शर्ट तुम्ही नेहमीच देऊ शकता. स्मार्ट कॅज्युअल्स, फॉर्मल्स, कॅज्युअल्स, टी शर्टस असे बरेच पर्याय तुमच्याकडे आहेत. आणि यात किमान बजेटपासून कमाल बजेटपर्यंत तुम्ही काहीही घेऊ शकता.

६. कफ लिंक्स टाय सेट

फॉर्मल शर्टसोबत छानसे कफ लिंक्स आणि टाय असेल तर क्या कहने!! आणि ते छान गिफ्ट पॅकमध्येही मिळतात.

७. ब्लेझर

पार्टी वेअर, स्मार्ट कॅज्युअल्स, फॉर्मल्स.. बरेच पर्याय आहेत यातही. 

८.  लेदर जॅकेट

फेब्रुवारीमध्ये मुंबई थंड नसते, पण इतर ठिकाणं थंड असू शकतात. आणि व्हॅलेंटाईन्स डे नसला तरी इतर खास प्रसंगांसाठी लेदर जॅकेट छान भेट ठरू शकेल. बाईकवर, थंड ठिकाणी फिरायला जाताना आणि अशा अनेक प्रसंगी घातलं जाईल.

९.फिटनेस बँड

फिटनेसची आवड असलेल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला एखादा छानसा फिटनेस बँड भेट द्या.

१०. कॅमेरा

"आपके खास पलोंको यादगार बनाने के लिए" DSLR हवाच. आणि तो तसा त्याला गिफ्ट दिला असला तरी नंतर आपणही वापरू शकतोच ना!! आधीच कॅमेरा घेतला असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, वेगवेगळ्या लेन्सेसची तुम्ही त्याच्या कलेक्शनमध्ये तुम्ही भर घालू शकताच.

११. पर्सनल ग्रुमिंग कीट्स

विराटकडून प्रेरणा घेऊन बरेचजण आजकाल दाढी-मिशा वाढवत आहेत. त्यांच्यासाठी बिअर्ड वॅक्स, मिशीचे तेल वगैरेंसारखी भन्नाट प्रॉडक्ट्स मिळतात. झालंच तर बॉडी वॉश, मसाज ऑईल्स वगैरेंसारखे प्रकारही असतात. या सगळ्यांचं मस्त कॉम्बो पॅक बनवून गिफ्ट द्या.

१२. पुस्तक

यासाठी मात्र त्यांच्याकडे कोणती पुस्तकं आहेत किंवा नाहीत हे माहित हवं, आवडही चांगलीच माहित हवी. जर का तुम्ही परफेक्ट पुस्तक देऊ शकलात, तर हे गिफ्ट खूपच आवडेल. 

१३. परफ्यूम

यासाठीही समोरच्या माणसाची आवड चांगली माहित हवी. स्ट्रॉंग परफ्यूम हवा की मंद दरवळणारा, हे चांगलं निवडता यायला हवं.

१४. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स

आता यात मोबाईल, ब्ल्यूटूथ स्पीकर्स, हेडफोन्स, वगैरेंसारखे बरेच पर्याय आहेत. 

१५. होम ब्रूईंग किट्स

आजकाल घरी बिअर वगैरे बनवण्याची क्रेझ वाढतेय. त्यासाठीची किट्स ऑनलाईन विकत मिळतात. त्यात पाककृती तर असतेच, वर ती बनवण्याची भांडी, साहित्य वगैरेही सगळं मिळतं. बस दोन-चार मित्र जमवून तुम्हांला घरी हा घाट घालायचा असतो इतकंच. भरपूर बिअर तयार होते, त्यात पार्टी करा आणि मित्रमैत्रिणींनाही वाटा. 


तर हे होते आम्हांला सुचलेल्या काही आयडिया. तुम्हांला यातला कोणता पर्याय अधिक आवडला? तुम्हांला आणखी काही सुचत असेल तर ते ही आम्हांला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required