तुम्हाला मांजरी बद्दल या १६ गोष्टी माहित आहेत का ?

जसा कुत्रा त्याच्या वफादारीसाठी आपल्याला आवडतो तसंच मांजरदेखील अनेकांना आवडते मंडळी. विशेषत: महिला वर्गाला आणि लहान मुलांना आपली ‘मनी माऊ’ खूप प्रिय असते. प्रसिद्ध गॉडफादर सिनेमातील मांजर तर पूर्ण जगात गाजली होती. पण मंडळी आपल्याला मांजर या प्राण्याबद्दल किती माहित आहे?
चला तर पाहूया मांजराबद्दल माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी :
१. मांजर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे.
२. साधारणपणे एका मांजराचं वय हे १२ ते १८ वर्षापर्यंत असतं.

३. जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली जाते. या कॉफीसाठी प्रत्येकी ५०० ग्रॅमसाठी १०० ते ६०० डॉलर (६८०० ते ४०८०० भारतीय रुपये) किंमत मोजावी लागते.
४. दर वर्षी ४० हजार मांजरीना आशियाई देशांमध्ये खाऊन फस्त केली जातं.
५. मांजर जवळ जवळ १०० प्रकारचे आवाज काढू शकते तर कुत्रा फक्त १० प्रकारचे आवाज काढू शकतो.
६. असं म्हणतात की मांजर पाळण्यामध्ये इजिप्शियन लोक जगात सर्वात पुढं होते. पण नुकत्याच भूमध्य प्रदेशातील सायप्रसमध्ये झालेल्या शोधात जगातील पहिली पाळीव मांजर ९५०० वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.
७. ‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.
८. हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते.
९. एक मांजर दिवसाला साधारणपणे १६ तास झोपते. म्हणजे नऊ वर्षांची मांजर तिच्या आयुष्याचे फक्त ३ वर्ष जागी असते.
१०. मांजर फक्त माणसांना बघूनच म्यॅव करते. दुसऱ्या मांजराला बघून फक्त गुरगुरणे किंवा हिस्सचा आवाज काढते.
११. जेव्हा एखादी मांजर तुम्हाला प्रेमाने अंग घासून निघून जाते तेव्हा त्याचा हेतू फक्त प्रेम व्यक्त करणे नसून त्या मार्फत आपला प्रदेश निश्चित करणे हा सुद्धा असतो.
मांजराच्या चेहऱ्यावर आणि शेपटाच्या भागात विशिष्ठ प्रकारचे गंध सोडणाऱ्या ग्रंथी असतात. त्या मार्फत मांजर आपली जागा निश्चित करते.
१२. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर त्याचा रीतसर दफनविधी करण्याची प्रथा होती. मांजराच्या शरीराचे ‘ममी’ मध्ये रुपांतर करण्यात येत असे.
१३. ‘हॅमलेट’ सर्वात जास्त प्रवास करणारी मांजर होती. हेमलेट एका विमानाच्या पॅनलमध्ये आढळली होती. जेव्हा तिची सुटका करण्यात अली तोपर्यंत तिने ६ लाख किलोमीटरचा प्रवास केला होता.
१४. युरोप आणि उत्तर अमेरिका भागात काळी मांजर अशुभ मानली जाते तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया भागात काळी मांजर चांगल्या नशिबाचं लक्षण समजली जाते.
