computer

हे फोटोशॉप नाहीय यावर तुमचा विश्वास बसेल का? पाहा हे २० अफलातून फोटो !!

फोटो एडिटिंग किंवा आपण ज्याला ‘फोटोशॉप’ म्हणून ओळखतो ते आजकाल फारसं कठीण काम राहिलेलं नाही. त्यासाठी तुमच्याकडे ॲडोबी फोटोशॉपसारखं अॅप असायलाच हवं अशी अटही नसते. इंटरनेटवर अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला सोप्प्या पद्धतीने फोटो एडिटिंग करता येऊ शकतं. एवढंच नाही तर एडिटिंग मोफत आणि सहज करता येईल असे अॅप्सही उपलब्ध आहेत.

तर, एडिटिंगचं काम सोप्पं असलं तरी तुम्ही जर बरोबर वेळेत, अचूक जागा निवडून फोटो काढलेत, तर तुम्हाला फोटोशॉपची गरजच भासणार नाही. आजच्या लेखात आम्ही असे २० फोटो घेऊन आलो आहोत जे पूर्णपणे नैसर्गिकरीत्या घेण्यात आले असले तरी एडिट करून खास केल्यासारखे वाटतात.

चला तर सुरुवात करू.

१. पृथ्वीबाहेर झेपावणारं अंतराळयान.

२. अंटार्क्टिकाच्या समुद्रात बुडालेलं जहाज.

३. वादळात आकाशाचा बदललेला रंग.

४. अल्बिनो आजाराने ग्रस्त असलेलं हरीण.

५. झाडावर वीज कोसळल्यावर काय झालं पाहा.

६. तैवानमध्ये भूकंपानंतरची परिस्थिती.

७. ते ढग नाहीत बरं का. झाडावरचं बर्फ वितळत आहे.

८. समुद्र हळूहळू गिळंकृत करतोय रशियातली एक इमारत.

९. ही एक ग्राफिटी आहे यावर विश्वास बसेल का ?

१०. उडत्या तबकड्या की इमारतींच्या छतांवरचे दिवे?

११. दिसतंय शहर, पण आहे स्मशानभूमी.

१२. कुठे चाललाय हा रस्ता?

१३. इमारतीला आग लागली आहे? नाही राव, इमारतीच्या काचेवर सूर्याचं प्रतिबिंब पडलंय.

१४. पाय कुठे गेले?

१५. पुलाखालची जागा.

१६. आला म्हणतात Mammatus cloud.

१७. गोठलेला पाण्याचा बुडबुडा

१८. आकाशाचं प्रतिबिंब.

१९. हे USB Cable नाहीत, ऑस्ट्रेलियातील विंडफार्म आहे.

विंडफार्म म्हणजे पवनचक्कींचा समूह असलेली जागा. आपल्याला जे USB चं टोक दिसत आहे ती खरं तर पवनचक्कीं उभारण्याची जागा आहे. 

२०. कुत्र्याला आग लागली आहे?

धक्का बसला ना? पण घाबरू नका. कुत्र्याला काहीही झालेलं नाही. कुत्र्याच्या शरीरावर रंग लागला आहे. हा क्षण फोटोत अशा पद्धतीने कैद झाला की कोणालाही वाटावं कुत्रा आगीतून धावतोय.

सबस्क्राईब करा

* indicates required