computer

दागिने सोडा, सोन्याचं आईस्क्रीम आलंय भाऊ मुंबई-अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये !!

गेल्या काही दिवसात आपण गोल्ड प्लेटेड पिझा, गोल्ड प्लेटेड डोनट इंटरनेटवर व्हायरल होताना पाहिलं आहे.  अहं, हे काही दागिन्यात वापरतो ते सोनं नसतं. खायचं सोनं वेगळं असतं. सध्या भारतात  या खायच्या सोन्याच्या पदार्थांचा ट्रेंडच बहुदा  आला आहे.  आता या ट्रेंडमध्ये आम्हाला एक नवीन डिश सापडली आहे. आज आम्ही घेऊन आलो आहोत सोन्याचे आईस्क्रीम!!

हुबर अँड हॉली नावाची एक आईस्क्रीम पार्लरची चेन सुरु झाली आहे. अहमदाबाद, हैदराबाद शिवाय आपल्या मुंबईत जुहू तारा रोडवरपण यांची एक शाखा आहे. हे आईस्क्रीम पार्लर माईटी मिडास नावाच्या एका डेझर्टसाठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईस्क्रीममध्ये म्हणे एकूण १७ घटक आहेत.  हे प्रकरण त्याच्यावर टाकण्यात येणाऱ्या खऱ्या सोन्याच्या वर्ख साठी फेमस होतंय भाऊ!! 

काय आहे हे प्रकरण?

एक waffle cone घेतला आहे. त्यात ब्राऊनीचे तुकडे, बदाम, गरमागरम हॉट चॉकलेट फज टाकले आहेत. त्याच्यावर गोल्डन चॉकलेट आईस्क्रीम टाकले आहे. या आईस्क्रीमवर अजून एक चॉकलेट आईस्क्रीमचा बार अजून टाकला आहे.  या सगळ्या कडी म्हणून २४ कॅरेट सोन्याचा वर्ख यावर टाकण्यात येतो. या आईस्क्रीमचा एक कोन खाण्यासाठी तुम्हाला फक्त १००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.  किंमत बघता तो वर्ख एकदा २४ कॅरेटसाठी तपासून घ्यावा असं आम्हाला वाटतंय. काय म्हणता?

आपल्या भारतात सोनं खायची लई जुनी परंपरा आहे. आजही बाळांना सुवर्ण घुटी देतात, आयुर्वेदात सुवर्ण भस्म औषध म्हणून वापरलं जाते. पण आईसक्रीम सारख्या वस्तूत  सोनं वापरण्याचं फॅड मात्र नवीन आहे. काय मग, कोण कोण या ट्रेंडमध्ये सामील व्हायला तयार आहात???

सबस्क्राईब करा

* indicates required