computer

भारताच्या टीममध्ये चक्क तोतया क्रिकेटर? तो कसा पकडला गेला?

आजवर पोलिसांचे कपडे घालून गुन्हे करणारे किंवा सहज हौस म्हणून विविध वेशभूषा करणारे लोक पाहिले असतील. मात्र हेच क्रिकेटच्या बाबतीत कधी ऐकलं आहे का? क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर चक्क एक तोतया क्रिकेटर आढळून आला. इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सवर जेव्हा लंच ब्रेक घेऊन इंग्लंड बॅटिंग साठी उतरले तेव्हा त्यांना वेगळाच नजारा पाहायला मिळाला.

भारताचे ११ खेळाडू बिल्डिंग करायला हवे मात्र मैदानात बारा खेळाडू दिसत होते. नेमका हा १२ वा खेळाडू कोण असेल याबद्दल संभ्रम निर्माण झाला. एक भाऊ चक्क भारतीय क्रिकेट जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्याला ओळखायला काय वेळ लागला नाही. 

लागलीच तिथल्या सिक्युरिटीने त्याला उचलून मैदानाच्या बाहेर घालवले. मात्र या प्रसंगाने भारतीय खेळाडू, कॉमेंटेटर्स, प्रेक्षक सगळयांना हसू आवरत नव्हते. एवढेच काय तो क्रिकेटवर पण हसत हसत मैदानाबाहेर गेला. 

त्याचा मैदानावर येण्याचा हेतू त्यालाच माहिती मात्र भावाने सगळ्यांचे लक्ष मात्र चांगलेच खेचून घेतले आहे. कालपासून त्याचा हा व्हिडिओ क्रिकेटप्रेमींना चांगलाच हसवत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required