हे आहेत वनडे क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ३ फलंदाज,एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश....

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणं स्वाभाविक आहे. वनडे, टी -२० आणि कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचे ३ फॉरमॅट आहेत. तसं पाहायला गेलं तर कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज षटकार कमी आणि चौकार जास्त मारताना दिसून येतात. मात्र वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये उलट आहे. इथे चौकार कमी आणि षटकार जास्त पाहायला मिळत असतात. हेच कारण आहे की, टी -२० क्रिकेट पाहण्यासाठी चाहत्यांची जास्त गर्दी होत असते. केवळ ३ तासात २०० पैकी अधिक धावा आणि चौकार षटकारांचा पाऊस. पावरप्लेच्या षटकांमध्ये फलंदाज गोलंदाजांवर तुटून पडत असतात. दरम्यान आम्ही तुम्हाला अशा ३ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी वनडे क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत. चला तर पाहूया कोण आहेत ते ३ फलंदाज.(most sixes in a odi innings) 

ओएन मॉर्गन (Eoin Morgan) :

या यादीत सर्वात पहिल्या स्थानी इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. ओएन मॉर्गनने अफगानिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला होता. तारीख होती १९ जून २०१९, मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने होते. या सामन्यात ओएन मॉर्गन अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने या सामन्यात ७१ चेंडूंमध्ये २०८.४५ च्या स्ट्राइक रेटने १४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि १७ गगनचुंबी षटकार मारले होते.

रोहित शर्मा(Rohit Sharma) :

या यादीत दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. २०१३ मध्ये रोहित शर्माची बॅट आग उकळत होती. याच खेळी दरम्यान त्याने दुहेरी शतक झळकावत, ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणाचं कंबरडं मोडलं होतं. २०१३ मध्ये बेंगलोरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याने १५८ चेंडूंमध्ये १३२.२७ च्या स्ट्राइक रेटने २०९ धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याने १२ चौकार आणि १६ षटकार मारले होते.

एबी डिविलियर्स (Ab devilliers) :

या यादीत तिसऱ्या स्थानी आहे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स. मिस्टर ३६० नावाने प्रसिद्ध असलेल्या एबी डिविलियर्सने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तसेच एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता. तारीख होती १८ जानेवारी २०१५. हा दिवस वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी खूप वाईट होता असं म्हणणं चुकीचं नसेल. कारण याच दिवशी एबी डिविलियर्सने त्यांना चोपून काढलं होतं. या सामन्यात एबी डिविलियर्सने अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ३३८ च्या स्ट्राईक रेटने १४९ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि १६ षटकार मारले होते.

काय वाटतं वर्तमान भारतीय संघातील असा कोणता फलंदाज आहे जो रोहित शर्माचा एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडून काढेल? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required