३८ मुलांना जन्म देणारी ३९ वर्षांची आई !!!

महाभारतात गांधारीनं १०० कौरवांना जन्म दिला असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. त्यापाठी अनेक कथाही आहेत. आता ते कसे झाले, वगैरे हा वेगळा मुद्दा. पण एका स्त्रीला एवढी मुलं होणं हीच मुळात असामान्य गोष्ट आहे.

आजच्या काळात १०० मुलं असलेली स्त्री सापडणं मुश्कील आहे. पण युगांडात अशी एक स्त्री आहे जिला तब्बल ३८ मुलं आहेत

कोण आहे ही स्त्री ? चला जाणून घेऊया !

युगांडात राहणारी ‘मरीयम नबातांजी’ असं तिचं नाव. मरियम सध्या ३९ वर्षांची आहे. तिचं लग्न खूप कमी वयात झालं असल्यानं १३व्या वर्षीच ती पहिल्यांदा आई बनली. त्यानंतर मात्र मुलांची जणू रांगच लागली. तिला ६ वेळा जुळी, ४ वेळा तिळी आणि ४ वेळा चौळी म्हणजेच एकाचवेळेला ४ मुलं झाली आहेत. तिला आतापर्यंत एकूण ४४  मुलं झाली आहेत. त्यातली  ३८ मुलं जगली. ३८ मुलांचा आकडा बघता तिला तिच्या गावात मुलांना जन्म देणारी मशीन म्हटलं जातंय.

Image result for 39 year old woman give birth to 38 childrensस्रोत

मरियमच्या म्हणण्याप्रमाणं तिच्या वडिलांना पण एक नाही, दोन नाही, तब्बल ४५ मुलं होती. पण ती  वेगवेगळ्या स्त्रियांकडून झाली होती.   त्यातही जुळ्यांचीच संख्या जास्त होती. तिच्या वडिलांचेच ‘जीन्स’ तिच्यात आल्याचं डॉक्टर म्हणतात.

मरियमनं बर्थ कंट्रोलसाठी अनेक उपाय करून बघितले. पण त्या उपायांमुळे तिच्याच जीवाला धोका असल्याचं समोरं आलं. मुलांना जन्म देण्याचा हा प्रकार अंडाशयात प्रमाणाबाहेर तयार होणाऱ्या स्त्री बिजामुळे होत असल्याचं म्हटलं जातंय.

मरियमला तिचा नवरा मुलांना सांभाळण्यात मदत करत नाही त्यामुळे ती एकटीच सर्वांचा सांभाळ करते. एवढं असून सुद्धा ती आपल्या मुलांना ओझं न मानता देवाने दिलेली देणगीच म्हणते हे विशेष.

सबस्क्राईब करा

* indicates required