गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच !

गेल्या शतकाच्या सुरुवातीला स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली.याच काळातील ही कथा आहे केतकर वहिनींची.मूळच्या मुंबईच्या वहिनी लग्नानंतर कोकणात गेल्या.जमीनीच्या वादामुळे त्यांच्या पतीचा खून झाला.मग सुरु झाला प्रतिकूल परिस्थिती आणि .कायद्याची लढाई. ! त्या ल्अढाईला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत-झगडत राहणाऱ्या केतकरवहिनींची कहाणी नक्की वाचाच. गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर त्याच पुस्तकातील ही कथा पण वाचा.
(केतकर वहिनी बजू वहिनींची कथा सांगताना म्हणतात)
त्या अगदी न कळत्या वयाच्या असताना त्यांचा (म्हणजे बजू वहिनींचा) नवरा गेला होता.
त्यांना त्याचा चेहेराही आठवत नव्हता.त्या काळच्या पध्दतीप्रमाणे त्यांना सोवळं करण्यात आलं.
अशा सोवळ्या बालविधवांना त्या काळी घरच्याच माणसांकडून वाईट प्रकारे वापरलं जायचं.
बजूवहिनींच्या बाबतीतही हेच घडलं होतं.
दिवस राहिले.
पोट पाडण्यासाठी ठाऊक असलेले सगळे गावठी उपाय केले गेले.
पण कशालाही दाद न देता तो चिवट गर्भ वाढत राहिला.
असेच नऊ महिने भरले आणि कळा सुरु झाल्या.
गावातली सुईण आली.तिनं तिच्या पध्दतीनं अट घातली."हे कुणाचं पाप ? नाव सांगितलंस तरच सुटका करेन "!
कोंडीत सापडलेल्या बजूवहिनींना निरुपायानं सासर्याचं नाव सांगावं लागलं.
सुईणीने सुटका केली. मुलगा झाला. रडलादेखील !
त्यानंतर अशा परिस्थितीत नेहेमी जे केलं तेच केलं.
बाळाला बाजल्याच्या खुराखाली ठेवून बाळंतिणीला बाजल्यावर बसायला सांगितलं !